इटलीच्या या गावात सुर्यप्रकाश पडत नसल्याने आरसे लावुन प्रकाश पाडतात

 
इटलीच्या या गावात सुर्यप्रकाश पडत नसल्याने आरसे लावुन प्रकाश पाडतात
इटलीच्या या गावात सुर्यप्रकाश पडत नसल्याने आरसे लावुन प्रकाश पाडतात

सुर्यप्रकाश किती गरजेचा आहे हे आपण जाणतोच.इटली मध्ये एक असे गाव आहे कि त्या गावात भरदिवसा अंधार पडतो. इटली या देशातील उत्तर भागामध्ये आल्प्सच्या डोंगररांगेत विगानेला (Viganella) नावाचे एक छोटेसे टुमदार  खेडेगाव वसलेले आहे. या गावात २०० पेक्षाही कमी लोक राहतात. समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटर उंचीवर हे खेडेगाव वसलेले आहे. पण आजूबाजूला उंच असे आल्प्सचे डोंगररांग आहे. ज्यांची उंची १५०० ते २४०० मीटरपर्यंत इतकी आहे.यामुळे हे गाव एका खड्ड्यात किंवा दरीत फसले गेले आहे. आणि चारही बाजूंनी डोगरांनी वेढलेले आहे. अशा प्रकारच्या भूप्रदेशामुळे हे गाव नोव्हेंबर ते जानेवारी या काळात संपूर्णपणे डोगरांच्या सावलीत सापडते. या ८० ते ८५ दिवसांत गावातून सूर्याचे दर्शन होतच नाही ! यामुळे गावात अंधुकसा प्रकाश पडतो व दिवस असुनही संध्याकाळचे वातावरण राहते.या अंधारामुळे थंडीतही लक्षणीय वाढ होते. अशा प्रकारची घटना घडत असेल असे आपल्याला स्वप्नातही वाटले नसते.या अंधारामुळे आणि वाढलेल्या थंडीमुळे या दिवसांत नागरिकांचे जीवन कठीण होऊन बसत असते. या दिवसांत जनजीवन सुरळीत करण्यासाठी तेथील लोकांनी एक नामी उपाय शोधून काढला आहे. यामध्ये  फार मोठे किंवा अवघड असे तंत्रज्ञान वापरले गेले नाही, पण कठीण परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी केलेला हा एक यशस्वी प्रयत्न आहे.

इटलीच्या या गावात सुर्यप्रकाश पडत नसल्याने आरसे लावुन प्रकाश पाडतात
डोंगरावर बसवलेले आरसे

२००६ साली या गावाबाजूच्या उंच डोगरकड्यावर एक भलामोठा आरसा बसवण्यात आला. त्याची लांबी २६ फूट आणि रूंदी १६ फूट इतकी भलीमोठी आहे. हा आरसा या ८५ दिवसात सतत सूर्यकिरणे गावाकडे परावर्तित करत राहतो. इतका प्रकाश आणि उष्णता २०० लोकसंख्येच्या गावाला पुरेसी आहे. अशा प्रकारे या आरशामुळे गावाची प्रकाश आणि उष्णता दोन्हीची उणीव भरून निघते. हा आरसा बांधायला एक लक्ष युरो इतका खर्च आला आहे. पण त्याने जवळजवळ ३ महिने गावाला छळत असलेली समस्या चुटकीसरशी सुटली आहे.

इटलीच्या या गावात सुर्यप्रकाश पडत नसल्याने आरसे लावुन प्रकाश पाडतात
डोंगरावर असे आरसे लावले आहेत

या आरशाला कॉम्युटर द्वारे नियंत्रण ठेवले जाते. यासाठी एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम सतत या आरशाचे नियंत्रण करत असतो. आणि या प्रोग्रॅम द्वारे सूर्याच्या स्थितीनुसार आरशाची स्थिती बदलत राहते. हा आरसा गावाला दिवसाला ६ तासांपेक्षा जास्त काळपर्यंत प्रकाश पुरवत राहतो. हा प्रोग्रॅम नसता, तर या आरशाचा काहीच उपयोग झाला नसता.

अशाच प्रकारची समस्या ऱ्युकान (Rjukan) या नॉर्वे या देशातील तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावालाही छळत होती. तेव्हा याही गावाने हाच उपाय अवलंबून आपली समस्या सोडवली आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম