"व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश/ पोस्ट कसे सेव्ह करावेत.?"


"व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश/ पोस्ट कसे सेव्ह  करावेत.? "

आपण बरयाच व्हॉटसअप ग्रूपवर असतो.त्यावर दररोज हजारो संदेश/पोस्ट येतात. त्यातील काही अतिमहत्वाचे लेख असतात, काही कविता व लेख मनाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, दैनंदिन जिवन सुखकर करणाऱ्या टिप्स असतात, एैतिहासिक माहिती असते, शेतीविषयक मार्गदर्शन असते,महत्वाचे संदेश असतात.हे मेसेज आपणाला खूप आवडतात परंतु इच्छा असूनही आपण हे संदेश जतन करू शकत नाही किंवा प्रत्येक संदेश लिहून काढण्या इतपत वेळही आपल्याकडे नसतो.काहीवेळा मेसेज एवढे असतात की मोबाईल हॅंग होतात.यावेळी नाइलाजाने All clear करावे लागते.यामुळे चांगले मेसेज हरवले जातात.किंवा मोबाईल हरवणे, जुना मोबाईल देऊन नविन मोबाईल घेतला की जुने मेसेज मिळत नाहीत. 
"व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश/ पोस्ट कसे सेव्ह  करावेत.? "
या समस्येवर दोन उपाय सुचवत आहे.

१) 'टेलिग्राम' नावाचे application google play store  वरून घ्यायचे. वापरायला ते व्हॉटसअप सारखेच आहे.यामध्ये जाऊन एक ग्रूप सुरू करायचा.ग्रूप सुरू करताना किमान एकाला तरी प्रथम एड करावे लागते.त्याला एड करून ग्रूप चालू करायचा.आता या ग्रूपवर तुमच्या सह दोन मेंबर होतील( ग्रूप creat झालेनंतर त्या एड केलेल्या मेंबरला remove करायचे) आता या ग्रूप वर फक्त तुम्हीच असाल. आता या ग्रूपवर तुम्ही व्हॉटसअप वरील महत्त्वाचे मेसेज कॉपी करून 'टेलिग्राम ग्रूपवर'पेस्ट करू शकता. 

'टेलिग्राम'ची खासियत म्हणजे तुम्ही या ग्रूपवरील मेसेज जोवर डिलिट करत नाही तोवर ते तसेच सेव्ह राहतात.अगदी तुम्ही मोबाईल बदलला किंवा हरवला तरीसुद्धा. नविन मोबाईल वर टेलिग्राम घेऊन तुम्ही तुमचा नंबर टाकला तरी तुमचे मेसेज परत दिसतात.विशेष म्हणजे टेलिग्राम वरील सर्व डाटा सर्ववर सेव्ह राहत असल्याने तुमच्या मोबाईलचे स्टोरेज वापरत नाही. 

२) दुसरा उपाय

Playstore मधून Notebooks या नावाचे अॅप्लिकेशन मिळते. ते घेऊन मोबाईलवर इन्सटॉल करून व्हॉटसअप संदेश कायमस्वरूपी जतन करता येतात. 
व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश/ पोस्ट कसे सेव्ह  करावेत.? "
📚📒 Notebooks हे कसे शोधावे..?

Play store मध्ये जावून जसेच्या तसे Notebooks लिहून सर्च करा. वेगवेगळ्या रंगाची एकावर एक ठेवलेली पाच पुस्तके व त्यांच्याआधाराने पिवळ्या रंगाचे एक पुस्तक उभे केले आहे (📚📒)हा Notebooks चा आयकॉन आहे. केवळ असा आयकॉन असलेलेच Notebooks इन्सटॉल करा.

📚📒 Notebooks मधे महत्वाचे संदेश कसे जतन करावेत..?

Notebooks इन्सटॉल करून ओपन केल्यानंतर त्यामध्ये  + Plus हे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून आपण विषयानुसार आपणास आवश्यक तितक्या सिंगल नोटबुक तयार करू शकतो. त्यामध्ये १००० पर्यंत पेजेस घेता येतात. हव्या त्या डिझाईनचे कव्हर ठेवता येते. त्यांना विषयानुसार वेगवेगळी नावे द्यावेत उदा - ऐतिहासिक माहिती, महापुरुष, बोधकथा, प्रेरणादायी विचार, आरोग्य टिप्स, सुविचार  इत्यादी इत्यादी आपल्या गरजेनुसार.

त्यानंतर वेळोवेळी व्हॉटस् अपवरील आपले आवडते संदेश कॉपी करून त्या त्या विषयाच्या नोटबुक मध्ये पेस्ट करावेत..

दररोज कॉपी पेस्ट करण्याइतपत आपल्याकडे वेळ नसेल तर ते महत्वाचे संदेश वाचता क्षणीच ★ Star करून ठेवावेत व जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा हे  ★ Star केलेले संदेश Notebooks मध्ये विषयानुसार पेस्ट करावेत.

Whats app व Teligram व Notebooks ही तिन्ही वेगवेगळी अॅप्लिकेशन असल्या कारणाने Whats app डिलीट झाले तरी आपण Notebooks मध्ये जतन केलेला एकही संदेश डिलीट होत नाही.

 मोबाईल बदलला किंवा चोरी झाला तरी Notebooks व Teligram मध्ये जतन करून ठेवलेले जुने संदेश जसेच्या तसेच नविन मोबाईल मध्ये घेता येतात काय..?

होय घेता येतात. आपला मोबाईल चोरीला गेला तरी चिंता करण्याचे कारण नाही आपण जतन केलेली सर्व माहिती जशीच्या तशी नविन मोबाईल मध्ये घेता येते.यासाठी फार मेहनत करण्याची गरज नाही.याकरिता दोन पद्धती आहेत.

1) ऑफलाईन बॅकअप-

 हा बॅकअप आपल्या मेमरी कार्ड (Local Storage) मध्ये घेता येतो.  मोबाईल बदलतेवेळी नविन मोबाईल मध्ये आपण संग्रहित केलेले सर्व संदेश जसेच्या तसे घेता येतात.दर दहा-बारा दिवसांनी Notebooks चा ऑफलाइन बॅकअप घ्यावा.

2) ऑनलाईन बॅकअप-

हा बॅकअप घेण्यासाठी आपले Dropbox किंवा Google Drive अकाउंट हवे असते. कृपया हे अकाउंट तयार करावे. आपला मोबाईल चोरीला गेला असता आपण Notebooks मध्ये जतन करून ठेवलेली आपली सर्व माहिती नविन मोबाईल मध्ये जशीच्या तशी Restore करता येते. आपण नियमित ऑनलाईन बॅकअप घेतल्यास ऑफलाइन बॅकअप घेण्याची गरज नाही.

 Notebooks चे इतर फायदे कोणते..?

आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातील हिशेब, कामाच्या याद्या, नियोजन, आपण लिहत असलेले महत्वाचे लेख आदी गोष्टी वेगवेगळ्या नावांच्या नोटबुक तयार करून त्यामध्ये लेखन करून कायमस्वरूपी जतन करू शकता.

तसेच टेलिग्राम वर देखील वेगवेगळ्या नावाचे ग्रूप तयार करून माहिती, लेख  कॉपी पेस्ट करून अथवा लिहुन जतन करू शकता. 

गुगल प्ले स्टोअर लिंक

टेलिग्राम -https://bit.ly/3A1Dwpp

Notebooks -https://bit.ly/3Pw61B8


animated-mobile-phone-image-0011

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম