रहस्यमयी घाट : येथे तुम्ही वर्तमानकाळाच्या दोन वर्षे पुढे जाता

 रहस्यमयी घाट : येथे तुम्ही वर्तमानकाळाच्या दोन वर्षे पुढे जाता

भारतामध्ये तुम्ही कोठेही गेला तर त्या दिवशी संपूर्ण भारतात एकच तारीख असते. पाच दहा मिनिटे इकडेतिकडे झाली तर आपण समजु शकतो.पण जर संपूर्ण जगात एकच तारीख चालू असताना जर तुमचा मोबाईल पुढील दोन वर्षाची तारीख दाखवत असेल तर किती गोंधळ होईल. (मोबाईल मध्ये जर तुम्ही मॅन्युअली चुकीची तारीख बदलली तर WhatsApp सुध्दा चालत नाही) हा तुम्हाला अनुभव असेलच.

रहस्यमयी घाट : येथे तुम्ही वर्तमानकाळाच्या दोन वर्षे पुढे जातो
पण भारतातील झारखंड राज्यामध्ये तैमारा घाट असुन हा रस्ता रांची-जमशेदपूर NH-33 असा जोडला गेला आहे.

जर तुम्ही या घाटामध्ये जात असाल तर तुम्ही घाट सुरू होणे अगोदर २०२२ मध्ये असता व घाटात जामचुआ या ठिकाणी गेल्यावर थेट २०२४ मध्ये पोहचता.तसा मेसेज पण तुमच्या मोबाईल वर येतो की तुम्ही तारीख बदला म्हणून. कारण नेटवर्क कनेक्टिव्हिटी २०२२ असताना तुमच्या मोबाईलची तारीख चुकीची ठरवत असतो.यामुळे तुमचा मोबाईल वर्तमान काळाशी न जोडल्यामुळे WhatsApp चालत नाही

 या घाटामध्ये फक्त मोबाईलच नव्हे तर अनेकदा वाहनांची लाईट बंद होणे, वाहन कोणीतरी मागे आोढल्यासारखे अनुभव येणे,गाडीचे क्लच प्लेट जाम होणे,स्पीडोमीटर भलतेच दाखवणे असे प्रकार घडतात.याचबरोबर येथे चुंबकसूची(कंपास) देखील चुकीची दिशा दाखवतो. आपल्या भारत देशात टाईम झोन्स आहेत.तथापी ग्रीनीचमधली वेळ प्रमाण मानून जगभर हे टाईमझोन्स आखण्यात आलेले आहेत. भारतात GMT+5:30 म्हणजेच ग्रीनीच प्रमाणवेळेच्या पुढे साडेपाच तास असा 'इंडियन स्टँडर्ड टाईम' मान्य केला गेला आहे. टाईमझोन्सनुसार देशादेशांच्या वेळेत काही तासांचा फरक असतो.पण येथे काही तासांचा नाही तर दोन वर्षाचा फरक अनाकलनीय आहे.या घाट परिसरातुन कर्क रेखा गेलेली आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला  हा तैमारा घाटाचा हा परिसर मनाला भुरळ घालत असला तरी या घाटात होणारे अपघात व मृत्यु व विस्मयचकित येणाऱ्या अनुभवामुळे या घाटातुन प्रवास करण्यास लेक घाबरतात. अलिकडच्या काळात रामपूर ते तैमारा पर्यंतचा घाट परिसर गूढ रहस्यासाठी चर्चेत आहे. काहीजण तर या मार्गास 'मौत का घाट' असे म्हणतात.यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण नक्की आहे पण काय आहे ते समजत नाही.याबद्दल आधिक संशोधन झाले पाहिजे तरच यामागचे रहस्य उलगडले जाईल.  

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম