नागदिवाळी साजरे करणारे गाव


नागदिवाळी साजरे करणारे गाव

नागदिवाळी साजरे करणारे गाव


तुम्हाला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'बत्तीस शिराळा' हे गाव नागपंचमीला पुजणारे म्हणुन माहिती असेलच. असेच एक गाव आहे तेथे नागदिवाळी साजरी केली जाते. 

उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यामध्ये नाग दिवाळी साजरी करण्यात येते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीवर नाग दिवाळी साजरी करण्यात येते. हिंदू दिनदर्शिकेनुसार नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. या दिवशी नागांची विशेष पूजा करण्यात येते.अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.धार्मिक मान्यतेनुसार नागलोक नावाची एक अद्भुत सृष्टी पाताळात आहे,तसा धार्मिक कथांमधून उल्लेख देखील आढळतो व त्या ठिकाणी नागदेवता राहतात असेही त्या कथेत सांगितले आहे. माणसाच्या ठायी जी कुंडलिनी शक्ती आहे ती मणक्याच्या खाली सर्पकृती वेटोळे घालून बसलेली असते असे म्हणतात.

या दिवशी घरातील गृहलक्ष्मी नागाच्या प्रतिमेची पूजा करतात आणि घरात जेवढी मोठी माणसे असतात तेवढी पक्वान्ने करून ती नागोबाच्या प्रतिमेपुढे ठेवून त्यावर दिवे लावतात. दिवा हे दिर्घआयुष्याचे प्रतीक आहे. म्हणून नागाच्या प्रतिमेसमोर दिवा लावून त्याला नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा लाभ सगळे घेतात.

बत्तीस शिराळा येथे श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. तर चामौलीमध्ये मार्गशिर्ष महिन्यात नागाची पुजा केली जाते हाच तो फरक आहे. 

नागदिवाळी या दिवशी नागाची पूजा करतात. नागाला हिंदू पौराणिक कथांमध्ये देव मानलं जातं. लोक मंदिरांमध्ये जाऊन सापाची पूजा करतात. ते सापांपासून संरक्षण मिळण्यासाठी दूध वाहिलं जातं आणि चांदीचे साप दान देतात. भगवान कृष्णाने सर्प कालियाचा पराभव केल्याचा दिवस साजरा करण्यासाठीही हा सण आणि उपवास करतात.

नाग दिवाळीमागे असणाऱ्या पौराणिक कथेनुसार नागांना पाताळ लोकांचा देव मानले जाते. तसेच घरात नागाची रांगोळी काढून त्यासमोर दिवा लावल्याने मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात, असा विश्वास यामागे आहे.

नागदिवाळी साजरे करणारे गाव


महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील माना या आदिवासी समाजातील लोकसुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यांच्या मान्यतेनुसार आपल्या पूर्वजांना अर्पित आपल्या पूर्वजांना आठवून व त्यांना श्रद्धांजली म्हणून दिवे लावून  हा सण केला जातो.
 त्याचप्रमाणे नाग देवताची उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या सुटतात. त्यांची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष हा पूर्णपणे निघून जातो, असा चामोली जिल्ह्यातील लोकांचा विश्वास आहे.

चामोली जिल्ह्यामधील वान गावात नाग देवतेचे एक रहस्यमय मंदिर आहे. आजही असे म्हटले आणि मानले जाते की नागराज येथे वास्तव्यास असून स्वत: च्या रत्नाचे रक्षण करत आहे.या रहस्यमय नागमणीचे रक्षण करत असताना नागराज दंश करतात आणि त्यामुळे लोक आजही दर्शन घेताना  ८० फूट अंतरावरून नमस्कार करतात
. असे म्हणतात की जेव्हा ब्रह्माजींनी नागांना शाप दिला तेव्हा नागांनी पुष्कर पर्वतावर जाऊन शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.  त्यांच्या समर्पण आणि प्रार्थनेने शिव प्रसन्न झाले आणि तेव्हापासून नाग त्यांच्या गळ्यातला शोभा बनला.  नागांबरोबरच डोंगर, नदी, वृक्ष, खडक, मातृदेवता, ग्रामदेवता यांची पूजा करण्याची परंपरा पुढे आली.जवळपास प्रत्येक गावात नागदेवाला लोखंडी त्रिशूळ, लोखंडी दिवा, मोठ्या झाडाखाली लोखंडापासून बनवलेला दोन तोंडी नाग देऊन सन्मानित करण्यात आले.  नृसिंह देवताही त्याच्यासोबत लोखंडी त्रिशूळाच्या रूपात बसत असे.

उत्तराखंडाची आराध्य देवता नंदा देवी यांच्या धर्म भावाच्या म्हणजेच लाटूच्या नावाने हे मंदिर बांधले गेल्याचे सांगण्यात येते. मंदिरातील पुजारी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. यामागे असे कारण  आहे की त्या रत्नाचा तेजस्वी प्रकाश हा माणसाला आंधळा बनवतो. एवढंच काय तर पुजाऱ्याच्या तोंडाचा वास देवतेपर्यंत पोहोचू नये आणि तसेच नागराजाचा विषारी वास पुजाऱ्याच्या नाकापर्यंत पोहोचू नये म्हणून रोज पूजेच्या वेळी नाकाला आणि तोंडाला पट्टी बांधूनच पुजाऱ्यांकडून पूजा केली जाते. सर्व भाविकांसाठी दरवर्षी वैशाख पौर्णिमेला वर्षातून एकदा या मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात.महादेवांच्या सर्व प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक "नाग" हे आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते.नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प तसेच सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो, कुटुंबात सर्पभय राहत नाही, असे पुराणात सांगितले आहे.

इतिहासात ५ अश्या शुर नाग राजांचे अंश सापडतात जे नाग ह्या वंशाचे होते.


१ अनंत हा सर्वात मोठा राज्यक्षेत्र-अनंतनाग,

२ वासुकी नागराज राज्यक्षेत्र-कैलास मानसरोवर.

३ नाग राजा तक्षक राज्यक्षेत्र- तक्षशिला, (आदिवासी राजा)

४  नाग राजा करकोटक राज्यक्षेत्र-रावी नदीच्या शेजारी,

५  ऐरावत राज्यक्षेत्र- रावी नदीच्या शेजारी.

देवनगरी किल्यावरचे नागबंध, औंरगाबाद

राज्य व भौगोलिक क्षेत्र वेगवेगळे असले तरी कोणावरही परकीय शत्रु चालून आला की एकीचे बळ दाखवत शत्रुस तोंड देण्याचे काम ज्या राजांनी केले आणि आपले साम्राज्य अबाधित ठेवले. नंतर कालांतराने पंचक्रोशीत शुर राजे असे नाव कमवून नाग राजांनी जनतेच्या मनात खास अशी जागा निर्माण केली. तोच 'नाग' वंश म्हणून ओळखला जाऊ लागला आणि संपूर्ण भारतभर नागवांशाचा प्रचार होऊ लागला.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম