कार चालवताना त्याच्या खिडक्या बंद ठेवाव्यात असा नियम नसला तरी आरोग्याच्या दृष्टीने पाहता ते योग्य आहे.अनेकांना कार चालवताना गाडीची खिडकी उघडी ठेवून गाडी चालवण्याची सवय असते.पण ही सवय घातक ठरू शकते.
तुम्हाला माहीत आहे का की कारची खिडकी उघडी ठेवून गाडी चालवण्याचे अनेक तोटे आहेत.गाडी चालवताना उघड्या खिडक्या वाऱ्याचा खूप आवाज निर्माण करू शकतात आणि ड्रायव्हरचे लक्ष विचलित करू शकतात.अशावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटण्यची शक्यता असते. याव्यतिरिक्त, उघड्या खिडक्या कारवर ड्रॅग तयार करू शकतात, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता कमी होते आणि अपघाताचा धोका वाढतो. कार चालवताना खिडक्या बंद ठेवणे कधीही चांगले.उदाहरणार्थ, तुमची श्रवणशक्ती कमी होते किंवा काही वेळा ऐकण्याची क्षमता कायमची प्रभावित होते.
याशिवाय तुमच्या कारची सरासरीही कमी होते.एवढेच नव्हे तर उघड्या काचेमधून सतत आत येणाऱ्या धुळीमुळे डॅशबोर्डची रया जाते व एसीच्या पॅनलमध्ये देखील धूळ जाते.यामुळे तो बिघडु शकतो.
कारची काच उघडी ठेवून गाडी चालवल्याने काय काय नुकसान होऊ शकते ते पाहु.
श्रवणशक्ति कमी:
कारची खिडकी उघडी ठेवून वाहन चालवण्याचा श्रवणावर कायमचा परिणाम होतो.कारण काच उघडी ठेवून वाहन चालवताना आपल्या कानावर सतत ९० डेसिबल किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने आवाज आदळत असतो, जे आपल्या श्रवणशक्तीचे नुकसान करण्यासाठी पुरेसे आहे.
जर आपण सतत ३५ मिनिटांपर्यंत या आवाजाच्या संपर्कात आलो तर आपल्या कानाचे नुकसान झालेच म्हणुन समजा.
कार चालवत असताना जेव्हा एखादे जड वाहन आपल्या जवळून वेगाने जाते आणि वाहन हलल्यासारखे वाटते, तेव्हा आवाज १२० डेसिबलपर्यंत पोहोचतो.
यामुळेच जे लोक काच उघडून कार चालवतात, त्यांना टिनिटस (कानात सतत शिट्टी वाजवणे) हा आजार होतो आणि नंतर ते बहिरे होऊ शकतात.अशी बरीच उदाहरणे घडलेली आहेत.
वाहनांची सरासरी कमी होते :
गाडी चालवताना खिडकी ऊघडी असल्याने बाहेरील हवा आत शिरून पुढे जाणाऱ्या गाडीला अवरोध निर्माण करते परिणामी इंजिनवर ताण येऊन ते तेल जास्त वापरते परिणामी याचा परिणाम मायलेज वर येतो. आजच्या महागाईच्या युगात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एवढ्या वाढलेल्या असताना तेलाची बचत करणे हा सर्वात महत्त्वाचे आहे.
जेव्हा आपण कारची खिडकी उघडी ठेवून गाडी चालवतो, तेव्हा आपल्या कारला वायुगतिकी विरुद्ध कार्य करावे लागते. त्यामुळे इंजिनवर जास्त दबाव येतो आणि तेलाचा वापर जास्त होतो.यामुळे आर्थिक नुकसान होते.
कारची खिडकी उघडल्याने, कारचा सरासरी वेग ७ किमी/लि.ने कमी होतो.असा तज्ञांचा दावा आहे.
दमा रुग्णांसाठी धोकादायक:
जेव्हा आपण कारची काच उघडी ठेवून गाडी चालवतो तेव्हा आपण थेट प्रदूषणास सामोरे जातो.येणारया वारयाबरोबरच वातावरणातील दुषित घटक नाकावर येऊन आदळतात.व ते थेट फुफ्फुसात शिरतात.त्यावेळी दमा रूग्णास ते सहन होत नाही. दमा रुग्णांसाठी काच उघडून गाडी चालवणे धोकादायक ठरू शकते.
दम्याचे रुग्ण किंवा ऍलर्जी असलेल्या रुग्णांसाठी ते अजिबात चांगले नाही. यामुळे दम्याचा किंवा ऍलर्जीचा झटका येण्याची शक्यता वाढते.
याशिवाय, जर आपण आपल्या कारची खिडकी बंद ठेवून गाडी चालवली तर आपण थंडी, उष्णता आणि पावसाचा थेट संपर्कात येतो.म्हणुन गाडी चालवताना कारची काच बंद असणे केव्हाही चांगले.
पण बरेचजण गाडीच्या बंद काचेमध्ये जीव गुदमरतो.ही सबब पुढे करतात.त्यांनी कारमधील हवा फिरवणारी यंत्रणा चालू करावी जेणेकरून आत आणि बाहेरील हवा संतुलित करता येते.