⭕ म्हणुन ईद वर्षातुन तीन वेळा साजरी करतात. ⭕
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
दि १ आॅगष्ट २०२०
इस्लाम धर्मामध्ये साजरा होणारा ईदचा सण मात्र वर्षातून तीनदा येतो.
या बद्दल आधिक माहिती घेऊया.
*❇️ ईद-अल-अधा’ याला ‘बकरी ईद’* किंवा ‘त्यागाचा सण’ असे संबोधले जाते. यामागे देखील एक कथा सांगितली जाते.
अल्लाहने ‘हजरत ईब्राहीम’ कडे त्याच्या मुलाचा बळी मागितला. तेव्हा क्षणाचाही विचार नं करता आपल्या मुलाची हत्या करण्यासाठी ईब्राहीम पुढे सरसावताच अल्लाहने ‘इसहाक’च्या (ईब्राहीमचा मुलगा) जागी ‘बकरी’ प्रकट केली आणि ईब्राहीमला सांगितले की “तुझी माझ्यावरची निष्ठा पडताळण्यासाठी मी तुझी कसोटी घेतली आणि त्यात तू यशस्वी देखील झालास.”
*❇️ ईद – ए – मिलाद*
सण नसून – प्रेषित मोहम्मद ह्यांचा जन्मदिन असतो. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य म्हणजे ईद – ए – मिलाद!
मोहम्मद पैगंबरांच्या विचारांचा ग्रंथ असलेल्या ‘हदीथ’ नुसार, मक्का ते मदिना असा प्रवास पूर्ण केल्यानंतर पैगंबरांनी ‘ईद-अल-फितर’ आणि ‘ईद-अल-अधा’ची घोषणा केली. सन ६२४ मध्ये ‘जंग-ए-बदार’ ची लढाई जिंकल्यानंतर खुद्द पैगंबरांनी त्यांच्या अनुयायांसह पहिली ‘ईद-अल-फितर’ साजरी केली होती.
*❇️ ‘धूल हिज्जाह’* या इस्लामिक कॅलेंडरमधील बाराव्या आणि अंतिम महिन्याच्या १० व्या दिवशी ‘ईद-अल-अधा’चा दिवस येतो.
या दरम्यान मुस्लीम बांधव कोणताही उपवास करत नाही. या महिन्यात ‘हज्ज यात्रे’चे आयोजन मोठ्या प्रमाणवर केले जाते.
त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणजे ‘ईद-अल-अधा’ होय. ही ईद अडीच दिवस साजरी केली जाते.
या दिवशी मुस्लीम बांधव ‘बकरी किंवा बोकड’ अल्लाहला समर्पित करतात. यातून मिळणाऱ्या मटणाचे तीन भाग केले जातात. पहिला भाग हा कुटुंबियांसाठी असतो, दुसरा भाग नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये वाटला जातो. शेवटचा, तिसरा भाग अन्नासाठी भुकेलेल्या गरिबांना दिला जातो.
*‘कुराण’ सर्वांनाच समर्पण करण्याची सक्ती करत नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनीच बकरी किंवा बोकडाचा बळी द्यावा आणि मिळणारे मटण गरिबांसोबत वाटून खावे असे ‘कुराणा’त सांगितले आहे.*
*❇️ ईद-अल-फितर’*
‘ईद-अल-अधा’ मोठी ईद मानली जाते, तर ‘ईद-अल-फितर’ लहान ईद मानली जाते.
इस्लामिक कॅलेंडरमधील ‘रमदान’ या नवव्या महिन्याच्या समाप्ती पर्वावर आणि ‘शव्वाल’ या दहाव्या महिन्याच्या आरंभ पर्वावर ‘ईद-अल-फितर’ हा दिवस साजरा केला जातो.
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
‘रमदान’ च्या संपूर्ण महिनाभर मुस्लीम बांधव कडक उपवास पाळतात आणि विविध प्रकारे मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात. तसेच मद्य आणि इतर विलासी गोष्टींपासून दूर राहतात आणि मानसिक समाधान मिळवणाऱ्या गोष्टी आवर्जून करतात.
मुख्यत: उपवासाच्या माध्यमातून अध्यात्मिक आणि मानसिक सुख मिळवणे हा ‘ईद-अल-फितर’ सणाचा उद्देश आहे. चंद्राचे दर्शन झाल्यावर रमजान ईद साजरी करण्यास सुरुवात होते.