दि. २२ जुलै २०२०
http://bit.ly/377FuGP
दिवसेंदिवस मोबाईलचे व्यसन दारू किंवा ड्रग्सच्या नशेपेक्षा भयंकर बनत चालले आहे. हे मोबाईलचे व्यसन माणसाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूने कमकुवत करते. हे प्रमाण एवढे वाढले आहे की मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी युपी सरकारने चक्क सरकारी दवाखान्यांमध्ये व्यसनमुक्ती केंद्र चालू केली आहेत.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज म्हणजेच अलाहाबादला मोतीलाल नेहरू मंडलीय हॉस्पिटलमध्ये हे पहिले केंद्र उभारण्यात आले आहे. यासाठी पांच स्पेशालिस्ट डॉक्टर्स नेमण्यात आले आहेत. मोबाईलचे व्यसन खूपच वाढले आहे अशा रुग्णांवर या केंद्रातल्या स्पेशल माईंड चेंबरमध्ये उपचार करण्यात येईल. इथे त्यांचे समुपदेशन म्हणजेच काऊन्सिलिंग करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर औधोपचारहीसुद्धा करण्यत येतील. इथे मोबाईलचे व्यसन जडलेल्या रोग्यांचे पांच डॉक्टर्सकडून डोळे, मेंदू तसेच जनरल फिजिशियनकडून स्पेशल चेकअप करण्यात येईल.आपण वाचताना माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,या व्यसनमुक्ती केंद्रात मोबाईलचे व्यसन तीन टप्प्यात सोडविण्यात येणार आहे. मंडळी, कदाचित देशातले हे पहिले मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र ठरू शकते. सध्या किमान उत्तर प्रदेशातले तरी हे निश्चित पहिले मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र आहे. प्रयागराजच्या पहिल्या अशा केंद्रानंतर हळूहळू पूर्ण उत्तर प्रदेशात अशी केंद्रे तुम्हाला जागोजागी दिसतील
विडिओ गेम्समुळे अगदी लहान मुलांमध्येसुद्धा हिंसक वृत्ती जागृत व्हायला लागली आहे. पब्जीमुळे झालेले अनेक मृत्यु तर गेल्या काही काळात चर्चेचा विषय ठरले आहेत. अशा पार्श्वभूमीवर सरकारला हा मुद्दा गंभीर वाटायला लागला आहे हे चांगलेच आहे.
बोभाटा वरून साभार
________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498☜♡☞
‼ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ‼
__________________________