प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त@ प्रमाणपत्र कागदपत्राची पुर्तता

 प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र कागदपत्राची पुर्तता 

 

फेसबुक लिंक https://bit.ly/3mppztA
शासकीय कामांसाठी खाजगी जमीन/शेती जमिनीचे जेव्हा भूसंपादन होते.तेव्हा ज्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.शासकीय नोकरीमध्ये आरक्षण,कोर्टातील संपादित जमिनीचा मोबदला प्राप्त करण्यासाठी,प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त असणारया विविध शासकीय योजना अनुदान इ. साठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.

प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र कागदपत्राची पुर्तता

महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा १९९९ हा प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी असून नोकरीतील आरक्षण हा पुनर्वसनाचा एक भाग असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-
📎कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज .
📎.ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.
📎.रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सहप्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .
📎.संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तह्शीलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
📎.मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.
📎📎.मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीची मूळप्रती.इ – स्टेटमेंटची प्रत.
📎.मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .
📎.घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
📎प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र व पत्नीचे शपथपत्र.
📎प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
📎.मतदार यादीची नक्कल.
📎तलाठ्यांचे जमीन सम्पादन झाल्याचे प्रमाणपत्र.
📎.शिधापत्रिकेची / रेशनकार्ड / कुपनाची प्रत.
📎ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र
.📎.पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
📎प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.@
हि सर्व कागदपत्रे आपल्या जवळ असावीत.                                            ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম