निराशा आणि दारूपासुन सुटका करणारे आौषध

निराशा आणि दारूपासुन सुटका करणारे आौषध


.        दि. २५ सप्टेंबर  २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/2G1kfMG
  .         लोकांना व्यसनापासून परावृत्त करणे खरेतर खूपच आव्हानात्मक काम असते. त्यासाठी प्रबोधनाने काही झाले नाही तर औषधांचा मार्ग अवलंबला जातो. अगदी तंबाखूसारख्या व्यसनापासून ते दारुपर्यंतचे व्यसन सोडवण्यासाठी औषधांचा वापर केला जाते. फक्त व्यसनच नाही तर निराशेच्या गर्तेत सापडलेल्यांना सुद्धा बाहेर काढू शकेल असे औषध शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

निराशा आणि दारूपासुन सुटका करणारे आौषध

.
एक असे औषध वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे ज्यामुळे दारु पिण्याचे प्रमाण कमी होऊन व्यसनमुक्त होउ शकतो. तसेच निराश झालेल्यांनाही त्यातून बाहेर काढता येते असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. एका अभ्यासानुसार २००० च्या दशकात दारु पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले. त्याचे प्रमाण इतके होते की दर ८ व्यक्तींमागे एका व्यक्तीला दारु पिण्याची सवय होती.
वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, जगभरात १४ कोटी लोकांना नैराश्याने ग्रासले आहे. त्याचसोबत त्यांच्यात दारु पिण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे होणाऱ्या आजारांशीही त्यांना सामना करावा लागत आहे. सध्या या रोगांवर उपचार होऊ शकतील अशा ठराविक औषधांना मंजूरी मिळाली आहे. या औषधांचा उपयोग फक्त दारु पिण्याचे प्रमाण कमी करणे इतकाच आहे. त्याचा मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी वापर होत नाही. प्रोटीनयुक्त ‘रिसेप्टर’ औषधाचा अभ्यास करण्यात आला. यात औषधाच्या वापराने दारु पिण्याची ईच्छा कमी होत असल्याचे दिसून आले.

┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম