किती असावे तुमचे वजन, जाणून घ्या

किती असावे तुमचे वजन, जाणून घ्या 

फेसबुक लिंक https://bit.ly/3kIMyhK
योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे वजन नियंत्रणात राहते. मात्र, वजन नियंत्रणात ठेवणे म्हणजे किती वजन असावे, हे अनेकांना माहित नसते. केवळ स्लीम दिसणे एवढाच विचार केला जातो. परंतु, आपले वय आणि वजन यांचा ताळमेळ असणे गरजेचे असते.

किती असावे तुमचे वजन, जाणून घ्या

किती असावे तुमचे वजन, जाणून घ्या

पुरुषांच्या कंबरेचा घेर 102 सेमी. म्हणजे 40 इंचापेक्षा जास्त आणि महिलांच्या कंबरेचा घेर 88 सेमी. म्हणजे 35 इंचापेक्षा जास्त असल्यास हे लोक टाईप2 डायबिटीज, हाय BP, हृदयविकारसारख्या गंभीर आजारांना बळी पडू शकतात. यामुळे डॉक्टर वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. आता प्रश्न असा पडतो की, आपले वजन योग्य आहे की नाही हे कसे माहिती करून घ्यावे. याचे उत्तर आहे BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स. 1990 च्या शेवटी BMI फॉर्म्युला आला आणि वर्तमानात हा लठ्ठपणा मोजण्याचे इंटरनॅशनल आणि सर्वमान्य फॉर्म्युला मनाला जातो. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, दिल्लीचे चीफ सर्जन डॉ. आशिष भनौतक यांच्यानुसार बीएमआय फार्म्युलाचा वापर करून एखाद्याचे वजन सामान्य आहे की सामान्यांपेक्षा जास्त आहे हे समजू शकते. यावरूनच आयडियल वेट समजू शकते.♍माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,बीएमआय = वजन / उंचीचा वर्ग

उदाहरणार्थ.. ५ फूट ७ इंच (१.७ मीटर) उंचीच्या व ७५ किलो वजनाच्या माणसाचा बीएमआय= ७५/ (१.७)२ = २५.९

आशिया खंडातील विशेषत: भारतीयांमध्ये बीएमआय २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हंटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही♎ टॉक्सिक हार्मोन्स सोडते ज्याला एॅडीपो- सायटोकाईन्स असे म्हणतात.
उदाहरणादाखल एखाद्या अतिशय काटक स्त्रीचे अठरा ते विसाव्या वर्षीचे वजन ४५ किलो आहे व दहा वर्षानंतर ते ६० झाले, तर ती लठ्ठपणातच मोडते. तिच्या उंचीनुसार योग्य वाटणारे हे वजन तिच्याकरता धोकादायक असू शकते. त्यामुळे बारीक माणसाने आयुष्यभर बारीकच राहावे व जाड माणसाने आयुष्यभर बारीक होण्याचा प्रयत्न करावा.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম