मत्स्यतेलामुळे सैनिकांचा मूड सुधारण्यास मदत

मत्स्यतेलामुळे सैनिकांचा मूड सुधारण्यास मदत 

फेसबुक लिंक https://bit.ly/365DteY
युद्धक्षेत्रातून परतलेल्या सैनिकांमध्ये शारीरिक श्रमांचा अभाव आणि रक्तात मत्स्यतेलाचे (फिश ऑइल) घटलेले प्रमाण यामुळे नैराश्याची भावना घर करू लागते. मत्स्यतेलाचे सेवन वाढवल्यास सैनिकांचा मूड चांगला राहण्यास मदत होते, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे.

मत्स्यतेलामुळे सैनिकांचा मूड सुधारण्यास मदत
अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीतील संशोधक रिचर्ड क्रिडर आणि मेजर निकोलस बॅरिंजर यांनी १०० सैनिकांवर अभ्यास करून हे निष्कर्ष काढले. त्यानुसार शारीरिक श्रम, रक्तातील फिश ऑइल आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचे प्रमाण मूड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचे प्रमाण कमी झाल्यास माणूस निराश होतो. तर ते योग्य असल्यास उत्साही व प्रसन्न राहतो. सामान्य नागरिकांच्या तुलनेत सैनिकांना त्याची अधिक गरज भासते. कारण त्यांचे शारीरिक श्रम अधिक होतात. तसेच युद्धजन्य परिस्थितीत मनावर अधिक आघात होतात. ते भरून येण्यासाठी आणि मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी फिश ऑइल आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स महत्त्वाची भूमिका बजावतात.♍🐠🐟🐠🐟🐠🐟

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম