अमेरिकेतील स्वास्तिक नावाचे गाव : नाव न बदलण्याचा गावकरयांचा निर्णय

 अमेरिकेतील स्वास्तिक नावाचे गाव : नाव न बदलण्याचा गावकरयांचा निर्णय 


माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

होय, खरचं अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये "स्वास्तिक" नावाचे गाव आहे.या गावाने आपले नाव बदलावे अशी मागणी होत आहे. अनेकांनी याचा संबंध हिटलरच्या नाझी शासनाच्या हिंसेशी लावला आहे.

अमेरिकेतील स्वास्तिक नावाचे गाव : नाव न बदलण्याचा गावकरयांचा निर्णय

अनेक लोक स्वस्तिक हे नाव 1930 च्या दशकातला हुकूमशाहा अडोल्फ हिटलर आणि त्यांच्या नाझी पक्षाशी जोडून पाहतात. मात्र, या गावाचा इतिहास त्यापेक्षा अधिक जूना आहे. या गावाचे नाव संस्कृत भाषेतील शब्द स्वस्तिक नावावरुन  ठेवण्यात आले आहे. ज्याचा अर्थ 'कल्याण' असा होतो. डगलस यांनी म्हटलं की, या भागात अनेक लोक आहेत ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. मात्र, त्यांनीही नाव बदलण्यास विरोध केलाय. कारण हिटलरने स्वस्तिकचा अर्थ दुषीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, मोठा विरोध असूनसुद्धा गावकऱ्यांनी गावाचे नाव न बदलण्याच्या बाजूने कौल दिला आहे. गावाच्या परिषदेने सर्वसंमतीने गावाचे नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्तिक हिंदू संस्कृतीत शुभ प्रतिक मानले जाते आणि अनेक शुभ कामाच्या वेळी याचे पूजन केले जाते. दुसरीकडे स्वस्तित चिन्ह नाझी शासनाच्या हिंसेशीही जोडले गेले आहे. याच गोष्टीमुळे गावाचे नाव बदलण्यावरुन वाद निर्माण झाला होता.
स्वस्तिक चिन्हात एकमेकांना छेद देणाऱ्या दोन सरळ रेषा असतात, जे पुढे जाऊन 90 कोनामाध्ये मोडतात. त्यानंतर या रेषा आपल्या टोकापासून एका बाजूला झुकतात. न्यूयॉर्कच्या ब्लॅक ब्रुकच्या क्षेत्रात स्वस्तिक नावाचे गाव येते. या गावाला गेल्या शतकभरापासून स्वस्तिक या नावाने ओळखले जात असल्याचं सांगितलं जात. मात्र, माईकस अलकामो यांच्या म्हणण्यानुसार, गावाचे नाव स्वस्तिक असणे म्हणजे दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्यांचा अपमान करणे होय. विशेष म्हणजे या गावापासून जवळच दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्यांचे स्मारकस्थळ आहे. त्यामुळे परिषदेने गावाचे नाव बदलण्याबाबत विचार सुरु केला होता. 
नाव न बदलण्याचा निर्णय सर्वानुमते
परिषदेच्या सदस्यांनी 14 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत गावाचे नाव न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॅक ब्रूकचे पर्यवेक्षक जॉन डगलस यांनी गुरुवारी एका ईमेलमध्ये लिहिलय की, "ज्यांना आमच्या समुदायाच्या इतिहासाबद्दल माहीत नाही अशा लोकांना गावाचे नाव ऐकून अपमानजनक वाटले. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटलं. स्वस्तिक हे नाव आमच्या पूर्वजांनी ठेवलेलं आहे."

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম