लेक माझी लाडकी अबोली

        🤷‍♀ कविता 🤷‍♀

  लेक माझी लाडकी अबोली   

'अबोली' अशीच तुझी 
माया मिळावी 
माझ्या अंतरीची वेदना
तुला कळावी  
जपलेस तू प्राणा
पलीकडे मला
चिमुकले सांग हे 
कसे ग जमले तुला
सोसलेस तू एकटीने
बरेच काही
दुःख सोसूनी 
बनलीस माझी भारवाही
बनुनी माझी आई 
घेतेस पप्पांच्या 
बीपीची काळजी 
असे अनमोल रत्नं लाभले 
हीच पुण्याई माझी
रोमरोमात श्वासश्वासात
लपलीय लेक माझी
म्हणूनी क्षणा क्षणाला
आठवते 'सुप्रीमा' प्रतिमा तुझी
तुला जे जपतात
जिवापाड सारे
तेच सर्व आहेत
माझे ही प्यारे
म्हणूनच तर 
नंदा-दिपा-अबोली
मी पाहिली त्यात
श्री दत्ताची सावली
पिंजऱ्यातील चिमणीतच
आहे प्राण माझा
प्राणा पलिकडेही त्यास
जपतोय बाप तुझा
आहे साऱ्या विश्वात
सर्वश्रेष्ठ माझी लाडली
भाग्यवान बाप मी
माझ्या घरी ती वाढली
लेक माझी लाडकी अबोली
   ****************             
             रामचंद्र सुतार (सर) चांदेकरवाडी 8888818631
कन्या अबोली सोबत स्व:त सुतार सर
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম