तिचे’ 👀डोळे वेगवेगळ्या रंगाचे!

तिचे’ 👀डोळे वेगवेगळ्या रंगाचे! 
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________

फेसबुक लिंक https://bit.ly/375cXmx
न्यूयॉर्क : 👀
मागे एकदा वेगवेगळ्या रंगाचे डोळे असलेल्या मांजराचे फोटो इंटरनेटवर प्रसिद्ध झाले होते. या मांजराचा एक डोळा पिवळा आणि दुसरा गर्द निळा होता. आता अशाच प्रकारचे डोळे असलेली एक मॉडेल सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. तिचेही डोळे असेच वेगवेगळ्या रंगाचे आहेत.

मात्र, तिने वेगळ्या रंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स वापरलेले नसून हे नैसर्गिकरीत्याच असे आहे हे विशेष! 👀
हा फोटो कॅलिफोर्नियाची राहणारी साराह मॅक डॅनियल हिचा आहे. 20 वर्षांच्या या मॉडेलच्या सौंदर्यावर अनेकजण घायाळ आहेत. तिच्या डोळ्यांचा हा प्रकार जनुकीय कारणांमुळे घडलेला आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘हेटेरोक्रोमिया इरिडम’ म्हणतात. यात लोकांच्या डोळ्यांचे रंग वेगवेगळे असतात. साराहसाठी मात्र हा आजार फायद्याचा ठरला. डोळ्यांचा रंग वेगवेगळा असल्याने साराकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले. अगदी कमी काळात ती सुपर मॉडेल बनली. तिचा एक डोळा गर्द निळा असून दुसरा तपकीरी आहे.
➖➖➖➖➖➖➖ ➖➖    
           संकलन
            📞@9890875498        

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম