सापांपेक्षाही तरुण बनला विषारी....
दि.8 जानेवारी 2021
फेसबुक लिंक http://bit.ly/35nO5Vo
तुम्ही अनेकवेळा सापाच्या दंशाने माणसाचा मृत्यू झाल्याचे ऐकले असणार. मात्र, राजधानी दिल्लीत अशी एक व्यक्ती आहे की, त्याच्या केवळ थुंकण्याने कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. दिल्लीत राहणार्या या व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या जागी अत्यंत जहाल विषच असून त्यांच्या संपर्कात आलेल्याचा प्राणावर बेतू शकते.🐍
पश्चिम दिल्लीतील शादीपूर भागात राहणार्या मनोजला पूर्वी नशा करण्याचे व्यसन होते. हे व्यसन इतके वाढले की, अत्यंत धोकादायक ड्रग्सनीही त्याच्या शरीरावर प्रभाव पाडणे बंद केले. अफू, गांजा, चरस, हेरॉईन आणि डोडासारख्या ड्रग्सचा परिणाम होत नसल्याने मनोजने चक्क सापांचे विष घेण्यास सुरुवात केली. दुर्दैव म्हणजे असे भयानक व्यसन त्याला लहानपणापासूनच आहे. 🐍
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
मनोजच्या शरीरावर या सर्वांचा अत्यंत गंभीर परिणाम झाला आणि यामुळे त्याच्या शरीरातील सर्व रक्त विषच बनले आहे. त्याची थुंकी तर इतकी विषारी बनली आहे की, तिच्या संपर्कात आलेल्याचा मृत्यूही होऊ शकतो. उपचारासाठी मनोज लोहिया हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्याचे संपूर्ण शरीर विषारी झाल्याचे पाहून डॉक्टरही अवाक् झाले. यावेळी मनोजने आपण या धोकादायक व्यसनांच्या आहारी कसे गेलो, याची संपूर्ण कहानीच डॉक्टरांना सांगितली. मात्र, त्याने सापांचे विष कोठून मिळते, हे मात्र सोयीस्करपणे सांगितले नाही. यासाठी एखादे रॅकेट काम करत असल्याचे संकेतच मनोजच्या कबुलीतून मिळते, हे मात्र निश्चित असेल.
____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव ___________________________________
📞9890875498
Tags
नवल