समुद्रात आहे प्राचीन मंदिर
दि. ७ जानेवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3ns79b4
बाली : जगात अशी अनेक ठिकाणे आहेत की, ती आपल्या अनोख्या वैशिष्ट्याने, सौंदर्याने जगात प्रसिद्ध आहेत. यापैकी एक म्हणजे ‘बाली’ होय. येथील अत्यंत स्वच्छ समुद्र किनारे, चारीबाजूला पसरलेली हिरवळ आणि शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा यामुळे ‘बाली’ हे ठिकाण आणखी आकर्षक बनते. तसेच या बेटाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे भर समुद्रात अत्यंत प्राचीन मंदिर आहे.इंडोनेशियातील प्रमुख बेट म्हणून ओळखल्या जाणार्या ‘बाली’स जगभरातल पर्यटक आवर्जून भेट देतात. तसे पाहिल्यास या बेटावर अनेक प्राचिन आणि सुंदर मंदिरे असली तरी समुद्रात असलेले हे मंदिर हटके आहे.बाली’तील पेमुतेरान बीचवर सुमारे 90 फूट खोलवर असलेले प्राचीन मंदिर हे आजही कुतूहलाचे केंद्र बनले आहे. इंडोनेशियात समुद्रात असलेले हे अत्यंत प्राचिन आहे. तसे पाहिल्यास हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असले तरी तेथे भगवान विष्णूची मूर्ती आहे. जी सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीची आहे. हे मंदिर पाहण्यासाठी लोक स्कूबा डायव्िंहग व जलतरणाचा आधार घेतात.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi
Tags
धार्मिक