सातारा : शिवभक्ताने स्वखर्चाने उभारला ५० फुटी पुतळा
📸 सेल्फी पॉंईटसुद्धा तयार केला आहे
दि १८ फेब्रुवारी,२०२१
सातारा जिल्हयातील वेळे गावाजवळ रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ५० फूटी अश्वारूढ पुतळा उभारला असुन मराठ्यांची राजधानी सातारा या नावाने सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे.
याचबरोबर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.शिवभक्तांसाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंटचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांची राजधानी सातारा या दोन्हींची आठवण राहावी असा आहे. या महामार्गावरुन येणाऱ्या शिवभक्तांना महाराजांचा इतिहास कायम स्मरणात राहावा यासाठी हा उपक्रम रोहन यादवने केला आहे.
उदयनराजे भोसले यांनी या सेल्फी पॉईंटचे अनावरण केले. या वेळी बोलताना उदयनराजेंनी या सेल्फी पॉईंटच अनावरण करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असं सांगितलं
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रोहन यादव या शिव भक्त तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला असुन मराठ्यांची राजधानी सातारा या नावाने सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे. रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा उपक्रम करून अनोखी शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी घट्ट व्हावा हा या मागचा उद्देश आहे.मुंबईपासून बेंगलोर पर्यंत जवळपास एक हजार किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर साताऱ्याच्या प्रवेशालाच पन्नास फुटी अश्वारुढ शिवभक्तांसाठी उभारण्यात आला असून या ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांची राजधानी सातारा या दोन्हींची आठवण राहावी असा उद्देश आहे.या महामार्गावरुन येणारया शिवभक्तांना कायम स्मरणात रहावे यासाठी हा सेल्फी पाॅइन्ट उभारण्यात आला आहे.
हा पुतळा पाहण्यासाठी शिवभक्त गर्दी करत आहेत.
