विजापुर: अफजलपुर : अफजलखानच्या साठ (६४?) बायकांची कबर

विजापुर: अफजलपुर :  अफजलखानच्या साठ (६४?) बायकांची कबर






 

  विजापुर: अफजलपुर : अफजलखानच्या साठ (६४?) बायकांची कबर  

फेसबुक लिंक http://bit.ly/3bdCo5u

 

अफजलखान वधाचा इतिहास आपणा सर्वांना ठाऊकच आहे.त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी छ.शिवाजी महाराजांनी बांधली हे पण ठाऊक आहे.पण त्याच्या ६० बायकांची(६४?) कबर विजापूर पासुन जवळच अफजलपुर या निर्जन ठिकाणी आहे हे आपणास माहित नाही.स्वतःची अल्ला बरोबर तुलना करणारा अफजलखान जेव्हा स्वराज्यावर चालून येतो आणि येण्याआधी आपल्या बायका मारुन येतो याचा अर्थ असा होतो की त्याने महाराजांचा धसका घेतला होता व आपण परत जिवंत येऊ कि नाही याची त्याला शाश्वती नव्हती. यातच महाराजांच्या नावाची दहशत अफजलखानाच्या मनात दिसते. मोठ मोठ्या बडाया मारणारा असा हा डरपोक अफजलखान.

भटारणीचा मुलगा

 अफजलखानाचे मूळ नाव अब्दुल्ला असून तो एका भटारणीचा मुलगा होता. संपूर्ण दक्षिण प्रांतात खानाची दहशत होती. खानाचा शिक्का पाहिल्यावर त्याच्या आत्मविश्वासाचा अंदाज येऊ शकतो. त्यावरील मजकूर – ‘स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसाची उत्तमता आणि अफजलखानाची उत्तमता पडताळून पाहावी तर प्रत्येक जपमाळेतून अफजल-अफजल असाच आवाज येईल.’ असा आहे.इतकी घमंड या माणसाला होती.

अफजल खान एक शायर आणि कवी सुध्दा होता. त्याला संस्कृत भाषेचही ज्ञान होेते, तो एक नंबरचा नास्तिक होता. खुद्द अल्लाला सुध्दा तो मानत नव्हता. त्याने पर्शियन भाषेत एक शेर लिहिला होता. 

गर अर्ज कुनद सिपहर अअला

फजल पुजला व फजल अफजल

अझ हर मुल्की बजाए तसबीह

आवाज आयद अफजल अफजल.

त्याचा मराठी भाषेत असा अर्थ होतो, जर श्रेष्ठ स्वर्गाला इच्छा झाली कि उत्तम माणसांची उत्तमता व अफजलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवावी तर प्रत्येक ठिकाणांहून जपमाळेतील अल्ला अल्ला या ध्वनीच्या जागी अफजल हाच सर्वात श्रेष्ठ पुरुष आहे असा ध्वनीउमटु लागेल /जेव्हा कधी देवाला भीती वाटेल तेव्हा तो देव सुद्धा अफजल खान तू मला वाचव असे म्हणेल यातून त्याचा स्वतः विषयीचा महाभयंकर गर्व दिसून येतो.

दिसावयास बलाढ्य,उंच तगडा असा हा अफजलला आपल्या ताकदीचा प्रचंड गर्व होता.इतराना तो चिलटासमान मानत असे.

याच अफजलखानने आपल्या बायकांची सामुहिक कत्तल घडवुन आणली.या ठिकाणाला आज "खुन बावडी" म्हणुन अोळखले जाते.काहींच्या मते त्याला ६४ बायका होत्या असे मानले जाते तर काहींच्या मते त्याला ६० बायका होत्या.असे नमुद आहे.त्याने आपल्या बायकाना कधी व केव्हा मारले ते पाहु.

तो कपटी होता.१६५६ मध्ये मोगल बादशहा औरंगजेबाने याच अफजलखानाच्या तडाख्यातून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली होती. मोगलांना मदत केली म्हणून आपलाच मुख्य सेनापती खान महंमदला विजापूरच्या वेशीत अडकवून त्याचे तुकडे करण्याचे काम अफजलखानाने केले होते.त्याचप्रमाणे कनकगिरीच्या युद्धात शिवरायांचे मोठे बंधू संभाजी यांचा त्याने दगाफटक्याने मृत्यू घडवून आणला होता. 

पुढे शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आदिलशहाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम (उलिया जनावा ताज सुलताना) यांनी दरबारातील सरदारांना आव्हान देताच ही जबाबदारी अफजलखानाने आपल्या शिरावर घेतलेली होती  शिवरायाना जिंवत पकडुन आणण्यासाठी अफजलखान विजापुरहुन  शाही फर्माने आणि प्रचंड मोठी फौज घेऊन निघाला. जाण्याची तयारी सुरू झाली अफजलखान नास्तिक असला तरी त्याचा आपल्या गुरूवर विश्वास होता.शिवाय  ज्योतिष शास्त्रावर त्याची श्रध्दा होती.तेव्हा खानाने या स्वारीविषयी कौल मागताच त्याच्या गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत वर्तविले, परंतु अफजलखानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. 

अफजलखानच्या साठ(६४?)बायकांची कबर

त्याचा मुक्काम आत्ताचे अफजलपुर गावाजवळ पडला होता.मनात शंकाचा कल्लोळ माजला होता.आपण जर जिंवत परत आलो नाही तर आपल्या बायका इतर पुरूषाशी लग्न करतील हि शंका त्याला भेडसावत होती.

दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबतीत आणखी एक दुःखद बातमी घडली. ती म्हणजे त्याच्या सैन्यदलातील झेंडय़ाचा हत्ती (ढालगज) फत्तेलष्कर हा अचानकपणे मरण पावला. साहजिकच खानाच्या मनामध्ये शंकाकुशंका सुरू झाल्या. यावेळी खानाला ६४ बायका असून आपल्या माघारी यांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर स्वभावाने मार्गी लावला.,विजापूर-अथणी रस्त्यावर विजापूरपासून अगदी ८कि.मी.वर एका निर्जन जागी एक विहीर असून तिला आज ‘खून बावडी’ म्हणतात. काहींच्या म्हणण्यानुसार या विहिरीत अफझलखानाच्या या सर्व बायकांना ढकलून देण्यात आले तर काहींच्या मते क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी एक पत्नी पळून जात होती. तिलाही पाठलाग करून ठार करण्यात आले. या सर्वांना त्याच ठिकाणी दफन करण्यात आले. त्यामुळे तेथे ६४ कबरी असल्या तरी विजापुरात हा भाग ‘साठ कबर’ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी हिंदुस्थानात पुरातत्त्व विभागाची स्थापना केली होती. त्या खात्याअंतर्गत इ.स. 1880 साली या खात्याचे प्रमुख हेन्री पुसेन्स यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी करून साठ कबरींची माहिती फोटोसह संग्रहित केली होती. विशेष म्हणजे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात तो फोटो उपलब्ध आहे.

‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने 18 जानेवारी 2013 रोजी याची दखल घेऊन याबाबत प्रसिद्धी दिली होती. 

एकाच चबुतऱ्यावर ६४ कबरी  पाहताना इतिहास माहीत असेल तर मन हेलावून जाते. साधारणपणे यातील ४२ समाध्यांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्याच बाजूला खानाने स्वतःसाठी कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे म्हटले जाते,त्याची ही शेवटची इच्छा होती म्हणे,की आपला जर मुत्यु झाला तर आपणास या ठिकाणी दफन केले जावे. परंतु छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर खानाची कबर बांधली ते नंतर.तो इतिहास नंतरचा आहे.

ओसाड माळरानात अगदी नापीक जमिनीच्या परिसरात एक चिरेबंदी विहीर असून त्याच्या शेजारी एका भव्य दगडी चबुतऱ्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काळय़ा पाषाणात या ६४ कबरी आजही पाहण्यास मिळतात. दक्षिण उत्तर बाजूने चबुतऱ्याची लांबी जास्त असून त्यानुसार पहिल्या दोन रांगेत ७-७ कबरी आहेत, तर तिसऱया रांगेत ५ व ११ कबरीच्या  ४ रांगा आहेत. सध्या काही कबरी उद्ध्वस्त झालेल्या आहेत.

एकाच चबुतऱ्यावर ६४ कबरी  पाहताना इतिहास माहीत असेल तर मन हेलावून जाते. विजापुरात गेल्यावर फार कमी लोक इथे भेट देत असतात. म्हणूनच कदाचित इंग्रजीत याला ‘ब्लॅक टुरिस्ट स्पॉट’ म्हटले जाते. स्मशानभूमीचा भाग वेगळा असेल, परंतु एकाच ठिकाणी एका रांगेत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अशा कबरी पाहण्यास मिळत नाहीत. ज्याला रक्तरंजित इतिहास आहे

पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून ताब्यात घेतलेला आहे, मात्र तितकेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे साठ कबरींची दुरवस्था व्हायला लागली आहे. विशेष म्हणजे खानाचे वंशज गुलबर्गा जिह्यातील अफजलपूरला राहतात. त्या ठिकाणी खानाने बांधलेली मशीद व इतर वास्तू पाहण्यास मिळतात. एकंदर या घटनेविषयी मतमतांतरे असली तरी विजापुरात गेल्यानंतर साठ कबरींचा इतिहास हा वास्तूच्या रूपाने आजही जिवंत आहे. 

(Video नारायण कदम पाटील यांचेकडुन) 

🎥 Video  पहा http://bit.ly/3s5S41C


=========================


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম