मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्‍याने होतील 'हे' फायदे

 मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्‍याने होतील 'हे' फायदे  


दि. २० फेब्रुवारी २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3uha2QD
             मीठ हे कोणत्‍याही पदार्थाला रूचकर बनविण्यासाठी महत्‍वाचे असते. मीठाविना कोणत्‍याचं पदार्थाची कल्‍पना करता येत नाही. एखाद्‍या पदार्थात मीठ कमी असेल तर तो पदार्थ चवीला लागत नाही. तसेच कितीही चांगले जेवण बनवले तरी मीठाच्या योग्‍य वापराविना तो पदार्थ अपुराचं म्‍हणावा लागेल. असे हे चिमुटभर मीठ जसे अन्नात महत्‍वाचे असते. तसेच या मीठाचा आंघोळीच्या पाण्यात वापर केल्‍यास अनेक रोग आपल्‍यापासून दूर राहू शकतात. त्‍याचबरोबर अनेक प्रकारच्या संसर्गापासून देखील आपण वाचू शकतो. असे हे मीठाचे पाणी कशाप्रकारे उपयोगी ठरते ते पाहुयात.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्‍याने होतील 'हे' फायदे


अंगात ताप असताना कोमट पाण्यामध्ये सैंधव मीठ घालून त्‍या पाण्याने आंघोळ केल्‍यास अधिक फायदेशीर ठरू शकते. आंघोळीच्या एक बारडी कोमट पाण्यामध्ये १ ते २ चमचे मीठ आणि १ चमचा खोबरेल तेल मिसळून या पाण्याने आंघोळ केल्‍यास ताप कमी होण्यास मदत होते.याचबरोबर मीठाच्या पाण्यामुळे शरीराच्या मासपेशींमधले दुखणेही बरे होण्यास मदत होते. मीठाच्या पाण्याच्या आंघोळीने शरीरातील कॅल्‍शिअमची कमरताही दूर होते. तसेच हाडे, नखेही मजबूत होण्यास उपयुक्‍त ठरते.अनेकांना उन्हाळ्‍याच्या दिवसामध्ये अंगाला खाज येण्याची तक्रार असते. अशा लोकांनी मीठाच्या पाण्याचा आंघोळीसाठी वापर केल्‍यास अंगाची होणारी खाज दूर होण्यास मदत होते. तसेच झोपेची तक्रार असणार्‍यांसाठी मीठाच्या पाण्याची आंघोळ उपयुक्‍त ठरते.
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्‍याने शारीरिक तसेच मानसिक स्‍वास्‍थ्‍यही चांगले राहते. तसेच मीठाच्या पाण्याचा आंघोळीने आपल्‍याला आधिक ताजेतवाने वाटते तसेच आपल्‍या मनावरील ताण कमी करुन मानसिक शांतीसाठी हे पाणी प्रभावी ठरते.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●
.            ϻÃĤĮŤĮ

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম