नविन शोध
दुचाकी पंक्चर झाली ? नो प्राॉब्लेम, दुचाकीला आता स्टेपनीचा आधार
दि. २२ फेब्रुवारी २०१९
रस्त्या-वरून जाताना दुचाकीचा टायर पंक्चर झाल्यावर गाडीला धक्का मारणे किंवा गाडी ढकलत ढकलत पंक्चरच्या दुकानापर्यंत न्यावी लागते. जर दुकान जवळ असेल, तर ठीक नाही, तर गाडीचालकाची चांगलीच कसरत होते. यासाठी गाडीच्या स्टॅन्डजवळ छोटीशी स्टेपनी लावण्यात आली आहे. ज्यामुळे गाडी पंक्चर झाल्यानंतर गाडीला धक्का मारावा लागणार नाही. ही किमया केली आहे पिंपरीतील एच. ए. स्कूलमध्ये दहावीत शिकणार्या श्रेयस पाठक या विद्यार्थ्याने श्रेयस याचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व इन्स्पायर अॅवॉर्ड प्रदर्शनामध्ये 'स्टॅन्ड बाय रेअर व्हील फॉर टू व्हिलर मोटार व्हेईकल' या उपकरणाचे पेटंट रजिस्टर झाले आहे

साधारणत: गाडी पंक्चर झाल्यावर तिला ओढत नेताना तिची टायर व ट्यूब खराब होते. ते खराब होऊ नयेत, यासाठी स्टॅन्डच्या जवळ एक बार देण्यात आला आहे. त्यामध्ये पाइप अॅडजेस्ट केला आहे. त्याला एक व्हील बसविण्यात आले आहे. गाडी पंक्चर होईल, तेव्हा एक पूर्ण स्लॉट असेल, ज्यावर स्टॅन्ड लावून त्याची लांबी वाढवू शकतो, असे केल्याने मागचे चाक जमिनीला टेकत नाही. ज्यामुळे पंक्चर झालेले चाक बारच्या साहाय्याने वर उचलले जाईल, गाडीला ढकलण्याचे कष्ट करावे लागणार नाहीत आणि वाहनचालकास पंक्चरच्या दुकानापर्यंत जाण्याचा अवधी मिळेल. यामुळे शारीरिक श्रम, वेळ व पैसा या तिन्ही गोष्टींची बचत होणार आहे. ही यंत्रणा फक्त दुचाकी गाड्यांना वापरता येणार आहे. त्यामुळे दूरवर पंक्चर काढण्याचे दुकान असले, तरी गाडीला धक्का मारावा लागणार नाही. याबाबत श्रेयसला त्याचे वडील अरुण पाठक आणि शिक्षक योगेश्वर हविनाळ यांचे मार्गदर्शन लाभले. बनविण्याच्या कल्पनेविषयी श्रेयसला सांगतो की, त्याला स्वानुभावावरून हे उपकरण बनविण्याची कल्पना सुचली. तो आणि त्याचे वडील एकदा गाडीवरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे त्यांना गाडी पंक्चर काढण्याच्या दुकानापर्यंत ढकलत नेताना खूप त्रास झाला., दुकानात गेल्यानंतर कळाले की, चार ठिकाणी टायर पंक्चर झाले आहे आणि ट्यूब बदलावी लागेल. गाडी ढकलत नेल्यामुळे आम्हाला जास्ती खर्च आला. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी उपाय केला पाहिजे, म्हणून असे उपकरण तयार केले. असे उपकरण गाडी बनविणार्या कंपन्यांनी गाडीबरोबरच दिले, तर चालकांना त्याचा फायदा होणार आहे.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ϻÃĤĮŤĮ