. МаЂітіѕэvа
कच्च्या तेलात अंघोळ!
दि. २२ फेब्रुवारी २०१९
फेसबुक लिंक http://bit.ly/37ATkSI
सौंदर्यवृद्धीसाठी दुधा-मधाने आंघोळ करणार्या राण्यांचे किस्से आजही ‘मशहूर’ आहेत. अद्यापही सौंदर्यवृद्धी किंवा आरोग्यासाठीही वेगवेगळ्या प्रकारचे स्नान केले जात असते. इराणजवळील अजरबेजान नावाच्या देशातील नाफतलान शहरात असेच ‘हटके’ स्नान होते. हे स्नान आहे कच्च्या तेलाचे. बाथटबमध्ये कच्चे तेल भरून तिथे अनेक लोक ठराविक वेळ स्वतःला बुचकळून काढतात!
अशा प्रकारच्या स्नानाने 70 पेक्षाही अधिक प्रकारचे आजार दूर होतात असे तिकडे मानले जाते. एका हेल्थ सेंटरमधील ही कच्च्या तेलाची अंघोळ तिकडे चांगलीच लोकप्रिय आहे. क्रूड ऑईल म्हणजेच कच्चे तेल हे मज्जासंस्थेसाठी तसेच त्वचेच्या समस्यांवर गुणकारी असल्याचा समज आहे. नाफतलानमधील या हेल्थ सेंटरमध्ये त्वचेच्या आजारांवर तसेच संधीवात, नसांशी संबंधित आजारांवर उपचार घेण्यासाठी लोक येतात. याठिकाणी कच्च्या तेलाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून उपचार केला जातो. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय मार्ग आहे बाथटबमध्ये बसून अंघोळ करणे. त्यासाठी एक रुग्ण सुमारे 40 अंश सेल्सिअस तापमानात 130 लिटर तेलात अंघोळ करतो. यामुळे हाडांनाही आराम मिळतो असे म्हटले जाते. अधिक वेळ या बाथटबमध्ये बसून अंघोळ केल्यास त्याचा विपरित परिणामही होऊ शकतो, अगदी माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे विशिष्ट वेळेपर्यंतच रुग्णाला बाथटबमध्ये बसवले जाते.
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ϻÃĤĮŤĮ*_
Tags
माहिती
