घडयाळात 10 वाजून 10 मिनिटे हीच वेळ का दाखवली जाते?
तारीख 27 मार्च 2021
फेसबुक लिंक http://bit.ly/3fjR1bs
🕙पाहिलं असेल की घड्याळं ही १०:१० या स्थितीमध्ये सेट असतात. हेअसं का? यामागचं कारण तुम्ही देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्हाला उत्तर देखील मिळाली असतील. पण खरं सांगायचं तर तुमच्या कानी पडलेली उत्तरे ही बहुतके अफवा असू शकतात.
अनेकजण असे म्हणतात की १०:१० वेळेलाअब्राहम लिंकन यांनी अखेरचा श्वास घेतल्याने घड्याळं १०:१० वर सेट केलेली असतात. पण खरंतर लिंकन यांनारात्रीच्या १०:१५ मिनिटांनी गोळी मारली गेली आणि सकाळी ७:२२ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लिंकन यांच्या मृत्यूमुळे घड्याळं१०:१० वर सेट करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हणणे चुकीचे ठरते.घड्याळं १०:१० वर सेट असण्यामागची अजून एक अफवा म्हणजे १०:१० वेळेला नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवर अणुबॉम्ब पडला म्हणून घड्याळं १०:१० वर सेट केली जातात.
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
पण कागदपत्र सांगतात की फॅट मॅन बॉम्ब आणि लिटील बॉय बॉम्ब हे या शहरांवर १०:१० या वेळेला पडलेच नाहीत.जर तुम्हाला देखील कोणी अशी उत्तरे दिली असतील तर ती विसरून जा, कारण आम्ही तुम्हाला आता त्यामागचं खरं कारण सांगत आहोत.स्रोतयामागचं खरं कारण आहे- 🕙 सौंदयशास्त्र 🕙घड्याळ १०:१० या स्थितीमध्ये सेट असल्यास त्यामुळे घड्याळाला अनेक फायदे होतात.१०:१० वर घड्याळ सेट असल्याने त्याचे काटे स्वतंत्र असतात. म्हणजे आपण दोन्ही काटे पाहू शकतो आणि घड्याळाकडे पाहिल्यावर ते सरळ नजरेत भरतात. या खास शैलीमुळे घड्याळाला एक सौंदर्य शैली प्राप्त होते. जर हेच घड्याळाचे काटे एकमेकांवर असतील किंवा १०:१० च्या उलट स्थितीमध्ये असतील तर ते नजरेलाही छान वाटत नाहीत.
________________________________
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
✆ 9890875498
________________________________
Tags
माहिती