सावधान ! रात्री बेरात्री उठून तुम्ही खाताय तर हे नक्की वाचा…
दि. २७ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/31kAKKY
भूक लागणं ही तशी सामान्य बाब आहे. किंबहुना भूक न लागणं ही मात्र असामान्य गोष्ट आहे. शरीर सुद्ढ ठेवायच असेल तर जेवण करायलाच पाहीजे. पण जर जेवणाच्या व्यतिरिक्त रात्री -अपरात्री झोपेतनं उठून तुम्ही फ्रिजमध्ये काही खायला आहे का अस शोधत असाल तर सावधान. कारण तुम्हांला रात्री अपरात्री लागणारी ही भूक मुळीच सामान्य नाही. ते एका आजाराचे लक्षण आहे. ज्याला ईटींग सिंड्रोम म्हणतात. जर या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर भविष्यात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात..
या आजाराचा थेट संबंध व्यक्तीच्या मानसिक आरोग्याशी असल्याने वेळीच सावध होणं गरजेच आहे. दिवसभराच्या कामाच्या दगदगीनंतर काही जणांना शांतझोप लागते. तर काही जणांना दिवसभराचा कामाचा ताण रात्रीच जाणवायला लागतो. मग अशावेळी या व्यक्ती कुटुंबाबरोबर रात्रीचे जेवण तर करतात. पण तरीही त्यांना शांतपणे झोप लागत नसल्याने ते मध्येच उठतात. फ्रिजमध्ये ठेवलेल उरलेल जेवण परत गरम करुन खातात तर कधी तसच थंड जेवणही पोटात ढकलतात. ते नसेल तर किचनमधलेडबे चाचपडत बसतात.
त्यात ठेवलेले बिस्कीट, शेंगदाणे, पोहे, साखर, वेफर्स आणि काहीचनाही तर मॅगी बनवतात नाहीतर पापडही तळून खातात. गाजर,फळे दिसले तरी ते खातात. पण एवढं खाल्यानंतरही त्यांच समाधान होत नाही. ते पाणी पिऊन पुन्हा अंथरुणावर पडतात. जरा वेळ त्यांचा डोळाही लागतो. मग अचानक परत त्यांना मध्येच जाग येते. मगपुन्हा किचनमध्ये तीच शोधाशोध सुरू होते.जर तुम्हालाही अशी सवय आहे. तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सुद्ढ राहा.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
Tags
आरोग्य