=रसवंती गृहाची नावे नवनाथ/ कानिफनाथच असतात

 महाराष्ट्रात कोठेही जा रसवंती गृहाची नावे नवनाथ/ कानिफनाथच असतात 


फेसबुक लिंक http://bit.ly/3bmwkJt
महाराष्ट्रातील कोणत्याही एस.टी स्टॅण्डवर घुंगराचा खुळखुळ आवाज हमखास एेकु येतो.तो आवाज रसवंती गृहाचा असतो हे आपणास सरावाने माहिती झाले आहे.पण या रसवंती गृहाची नावे जर बघितली तर ते नाव नाथापैकी एकाचे असतेच असते.

रसवंती गृहाची नावे नवनाथ/ कानिफनाथच असतात

आमच्या पेठवडगाव स्टॅडवर पण एका रसवंती गृहात मी रस पिण्यास गेलो होतो. सहज नाव बघितले तर "कानिफनाथ रसवंती गृहा" अशी पाटी होती.माझे कुतुहल चाळवले गेले.म्हणुन हा लेख लिहितो आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक स्टॅण्डवर रसवंती गृह असते.स्वच्छ टापटीप हे या रसवंतीगृहाचं वैशिष्ट्य असते. आत मध्ये नवनाथांचे चित्र लावलेले असते. टिपिकल पांढरी टोपी विजारशर्ट / बंडी धोतर घातलेले काका ऊसाचा रस काढत असतात. घुंगराच्या मधुर सुरातल्या छुमछुम अशा लयीत मशीनचा गोल फिरणारा चरखा, त्यातून आतबाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपाड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस.हे झाले टिपिकल द्रूश्य.पण दुकानला नाव नाथाचेच का? तर ही रसवंती चालक मंडळी पुणे जिल्ह्यातुन आलेली असतात.पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील  बोपगाव हे गाव.पश्चिम महाराष्ट्राच्या मानान दुष्काळी पट्टा. पण इथला शेतकरी जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर शेती जगवत होता. त्याकाळात साखर कारखान्यांच पेव फुटलेलं नव्हत. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केट नव्हत. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता.मग एकाने सुरूवातीला पुण्यातच रसवंती गृह टाकले.पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं जायचं. पुढे लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे.स्टॅण्डवर गिर्हाईक भरपुर असल्याने धंदयाचा जम बसला.मग एकाचे पाहुन दुसर्याने,त्याचे पाहुन तिसरयाने असे करत रसवंती गृह वाढु लागली.,तर बोपगावची प्रत्येक मंडळी नाथाची भक्त असल्याने त्यांनी नाथाचेच नाव रसवंती गृहाना दिली.कारण,बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपैकी एक कानिफनाथस्वामी येथे तपश्चर्येला बसले होते. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदरतालुका या कानिफनाथांचा भक्त आहे.म्हणुन येथील प्रत्येकाने नाथाचीच नावे दिली.
नाथपरंपरेतील नऊ  नाथांची नावे पुढीलप्रमाणे सापडतात.
गोरक्ष – जालंदर – चर्पटाश्च अडबंग – कानिफ – मच्छिन्दराद्य:।
चौरंगी – रेवाणक – भत्र्रीसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धा:।।
मात्र या श्लोकामध्ये ग्रथित नसलेली अशी नागनाथ, गहिनीनाथ, शिवनाथ, मीननाथ, सत्यनाथ इत्यादी अनेक नावे नवनाथांपैकी आहेत.
शब्दांकन: अनिल पाटील पेठवडगाव
9890875498

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম