या गावात स्त्री विधवा होत नाही !
दि. ७ मार्च २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3bnigzt
☬ आजकाल मृत्यूचे प्रमाण इतक्या प्रमाणात वाढले आहेत कि दिवसाला लाखो लोक मरतात.वैज्ञानिकांच्या माहितनुसार मृत्युच्या प्रमाणात स्रियापेक्षा पुरुषांचे प्रमाण हे जास्त आहे.मध्य प्रदेशात एक आदिवासी भाग असा आहे जेथे एकही विधवा स्त्री नाही.म्हणजे अस म्हणायला काहीही हरकत नाही कि येथे पुरुषांचा मृत्यू होत नाही, असे मुळीच नाही. परंतु त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पत्नी विधवा राहत नाहीत. या परिसरातील परंपरेनुसार जर एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला, तर तिचे लग्न कुटुंबातील अविवाहित पुरुषाशी लावण्यात येते, मग तो महिलेचा नातू का असेना. हो हे खरं आहे. राज्यातील मंडला जिल्ह्यातील गोंड समाजात ही प्रथा प्रचलित आहे.या गावात हि प्रथा आहे.गोंड या समाजामध्ये तुम्हाला एकही विधवा स्री सापडणार नाही. भारतात आजही बहुतांश ठिकाणी पतीच्या मृत्युनंतर त्या महिलेला आयुष्यभर विधवा म्हणून जगाव लागत.पण इथे तस नाही,तसे या समाजामध्ये हि प्रथा मागील हजारो वर्षापसून सुरु आहेत.त्या लोकांच्या या प्रथेला एक आदर्श व्रत प्रथा अस म्हणायला काहीही हरकत नाही. तस जर बघायला गेल तर गोंड या समाजामध्ये अनेक प्रथा प्रचलित आहेत.या समाजामध्ये अनेक प्रथा मधील देवर पाटो आणि नाती पाटो अशा दोन प्रथा जास्त प्रचलित आहेत.पतीचा मृत्यू झाल्यानंतर घरात जर कोणीही पुरुष उरला नाही तर त्या महिलेला चांदीच्या बांगड्या दिल्या जातात.या बांगड्या तिला पतीच्या दहाव्याच्या दिवशी दिल्या जातात. आणि दहाव्याच्या दिवशीच त्या बांगड्या हातात घालाव्या लागतात.,देवर पाटो म्हणजे ज्या कुटुंबातील महिलेचा पती मरतो त्या कुटुंबात जर तिचा दीर जिंवंत आहे तर दहाव्याच्या दिवशी दीर तिला चांदीच्या बागड्या घालतो त्यानंतर ते आयुष्भर नवरा बायको म्हणून राहू शकतात. आणि नाती पाटो म्हणजे ज्या कुटुंबातील महिलेचा पती मरतो त्या कुटुंबात जर तिचा दीर हि नसेल आणि नातू असेल तर दहाव्याच्या दिवशी नातू तिला चांदीच्या बागड्या घालतो त्यानंतर ते आयुष्भर नवरा बायको म्हणून राहू शकतात. आणि विशेष म्हणजे या वयातील अंतर पाहता साधारणता या नात्यात शारीरिक सबंध नसतात,परंतु जर दोघांची मर्जी असेल तर ते एकमेकांच्या जवळ येऊ शकतात.तरुण-तरुणींमध्येही ही स्त्रियांचा सन्मान करणारी परंपरा आजही जिवंत आहे. अस म्हणायला काहीही हरकत नाही.
Tags
नवल
