झुरळांपासून बनते औषधी सरबत

 झुरळांपासून बनते औषधी सरबत !

-
*_🍄दि. ७ मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3qr8lgi
             ☬ बिजिंग(चीन) चिन्यांच्या चिनीमातीच्या वाडग्यात काय काय असेल, याचे कन्फ्युजन कन्फ्युशसलाही उलगडणार नाही. साप, बेडूक, किडे असे काहीही ही माणसं भाताबरोबर काडीने उचलून मटकावू शकतात.

झुरळांपासून बनते औषधी सरबत!❗


▪आपल्याकडे कुक्कुट पालन केंद्र किंवा रेशीम किड्यांची पैदास करणारी केंद्र पाहायला मिळत असतात. चिन्यांच्या अजब देशात चक्‍क झुरळ पालन केंद्रही असते. हे झुरळ त्यांच्यापासून एका प्रकारचे औषधी सरबत करण्यासाठी पाळले जातात. तेथील एक कंपनी दरवर्षी सुमारे 600 कोटी झुरळांची पैदास आणि पालन करते.
❗शीचांगमधील एक कंपनी असे झुरळ पाळून त्यांच्यापासून हे सरबतासारखे औषध बनवते. ‘झुरळाचे औषध’ म्हटल्यावरच आपल्याला उलटी आल्यासारखे वाटत असले तरी या औषधाचा उपयोग उलट्या-जुलाबवरच केला जातो हे विशेष!
 शिवाय पोटाचा अल्सर, श्‍वासोच्छ्वासातील अडचणी आदी अनेक आजारांवर हे सरबत स्वस्तातील उपाय असल्याचे तिकडे मानले जाते. त्यामुळे या सरबताचा ‘कच्चा माल’ म्हणून झुरळांचे काळजीपूर्वक पालन व संवर्धन केले जाते! चीनमध्ये अशाचप्रकारे सापांचीही पैदास केली जाते हे विशेष.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম