सुरळीत रक्ताभिसरण होण्यासाठी हे पदार्थ खा
दि. १२ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3uJ0qgS
आरोग्य चांगले राहण्यामध्ये आपण दररोज घेत असलेल्या आहाराचा मोठा वाटा असतो. धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अनेकदा आपले आहाराकडे दुर्लक्ष होते. मात्र हे दुर्लक्ष पुढे जाऊन आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालण्यासाठी आहारात असणारे विविध घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. जीवनसत्त्वे, लोह, प्रथिने, खनिजे असे सगळे घटक मिळण्यासाठी योग्य आहार आवश्यक असतो. शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रक्ताभिसरण चांगले असल्यास पेशींना मिळणारा ऑक्सिजन आणि त्यांचे पोषण योग्य पद्धतीने होते. त्यामुळे रक्तदाब तसेच, हृदयाचे काम नीट होण्यास मदत होते. पण यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा याविषयी देविका चक्रवर्ती यांनी दिलेल्या काही खास टीप्स… ♦लोह असलेल्या पदार्थांचा समावेश हवा
रक्तासाठी लोह हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. हिमोग्लोबिनचे काम योग्य पद्धतीने होण्यामध्ये लोहाची महत्त्वाची भूमिका असते. लोहामुळे रक्तावाटे शरीराला मिळणारा ऑक्सिजन योग्य पद्धतीने मिळतो. पण रक्तात लोहाची कमतरता असेल तर व्यक्तीला अॅनिमियाचा त्रास होतो. त्यामुळे लोह मिळतील अशा पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा. यामध्ये पालेभाज्या, बीट, सर्व कडधान्ये यांचा समावेश होतो.♦स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणात घ्या
स्निग्ध पदार्थ शरीराला आवश्यक असले तरीही त्यांचे प्रमाण योग्य तेच हवे. रोजच्या आहारात प्रमाणापेक्षा जास्त स्निग्ध पदार्थांचा समावेश असल्यास रक्ताभिसरण क्रियेत अडथळे येण्याची शक्यता असते. त्यामुळे डेअरीतील पदार्थ योग्य त्या प्रमाणात घ्या.♦आहारात फॉलेटचा समावेश करा
रक्ताभिसरण सुरळीत करायचे असल्यास आहारात फॉलेटचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. जीवनसत्त्व ब मध्ये फॉलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तपेशी तयार होण्यास तसेच हिमोग्लोबिनचे कार्य सुरळीत होण्यासही मदत होते.☕चहा पिणे उपयुक्त
रक्ताभिसरण चांगले व्हायचे असेल तर चहा पिणे आवश्यक आहे. चहामध्ये फ्लेवोनोइड्स, पॉलिफेनॉल्स आणि कॅटिन्स हे घटक असतात. या घटकांमुळे रक्तवाहीन्या विस्तारण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच धमन्यांचे कार्य सुधारण्यासही याची मदत होते. चहामध्येही ग्रीन टी, ब्लॅक टी याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता.____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ➰
______________________________
Tags
आरोग्य
