देवी सरस्वती जपानमध्ये जलदेवता

देवी सरस्वती जपानमध्ये जलदेवता
___________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव  
___________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/2RqnDGr
जपानमधील प्रतिमाविद्येला इ. स. सातव्या शतकात चालना मिळाली. तीवर आरंभीची काही शतके चिनी व कोरियन शिल्पकलेचा मोठा प्रभाव दिसतो. तो नवव्या शतकापर्यंत तरी टिकून होता. लाकूड, धातू व पाषाण या तिन्ही माध्यमांत जपानी प्रतिमा निर्माण झाल्या. दहाव्या ते बाराव्या शतकांतील जपानी प्रतिमाविद्या बरीचशी प्रभावमुक्त व स्वतंत्र असल्याचे आढळते.सरस्वती, गणेश आणि लक्ष्मी भारतीय देवतांची पूजा केली जाते त्याप्रमाणेच जपानमधील बौद्धधर्मीय या देवतांची आराधना करतात. हे अनेकांना जरी नुसते ठाऊक असले तरी प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि फोटोग्राफ्रर बिनॉय के. बहल यांच्या 'इंडियन डेइटीज वरशिप्ड इन जपान' या डॉक्युमेंटरीतून जपानच्या या अध्यात्मिक प्रवासाचा मागोवा घेतला आहे.

भारतीय ‌देवतांची जपानमध्ये पूजा केली जाते. विशेषतः सरस्वती देवीची शेकडो मंदिरे तेथे आहेत. जपानमधील या अध्यात्मिक नात्याला बहल यांनी डॉक्युमेंटरीतून मांडले आहे. त्यासाठी जपानमधील तब्बल पन्नास मंदिरांचे चित्रण करण्यात आले आहे. जपानमधील लोक धर्म आणि अध्यात्माला वज्रायनच्या शास्त्रीय सिद्धांताशी जोडतात. Ⓜत्याचे मूळ थेट बिहारमधील नालंदाशी जोडता येते, असे बहल यांनी सांगितले.


भारतात सरस्वतीला संगीत आणि विद्येची देवता मानले जाते, तर जपानमध्ये ती जलदेवतेच्या रूपात पूजली जाते. शिवाय लक्ष्मी, इंद्र, ब्रह्मा, गणेश आणि अन्य देवता जपानमध्ये कशाप्रकारे पूजतात, हे डॉक्युमेंटरीमधून मांडले आहे. बहल यांनी ही डॉक्युमेंटरी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एक्सपीडी विभागासाठी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी बहल यांना, जपान फाऊंडेशन आणि जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहकार्य केले आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম