बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता
जातीव्यवस्था हि प्रत्येक धर्मात आहे पण त्यासाठी धर्म जबाबदार नाही तर सामाजिक आणि आर्थिक विषमता त्याबरोबर तेथील काही व्यक्तींची कार्यपद्धती जबाबदार आहे ज्याप्रमाणे हिंदू धर्मात जातीव्यवस्था आहे त्याचप्रकारे बुद्ध ख्रीच्चन आणि इतर धर्मात हि आहेत .
भारतातील जातीवाद आणि अस्पृश्यता याबद्दल हिंदू धर्माला जबाबदार धरण्यात येते. ब्राम्हणांनी जाती तयार केल्या व कांही जातींना अस्पृश्य ठरवले असा ब्राम्हण विरोधकांचा एक लाडका सिद्धांत आहे. पण प्रत्यक्षात जाती बनण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत. अगदी सिंधू संस्कृतीत सुद्धा जाती आणि उच्चनीचता होती. फार तर असे म्हणता येईल की समाजातील या जातीवादाचा ब्राम्हणांनी आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला.Ⓜभारतातील लडाख भागात 'ओरिजिनल' बौद्ध धर्म आणि त्याचे अनुयायी आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था तर आहेच पण हे बौद्ध धर्मीय लोक अस्पृश्यतेचे पालनही करतात. विशेष म्हणजे यांच्यातील अस्पृश्य जाती या वेगळ्याच आहेत. त्यात लोहार व वादक या दोन जाती मुख्य आहेत. भारताच्या इतर भागात पूर्वी अस्पृश्यांना जी वागणूक दिली जायची तशी वागणूक या बौद्धबहुल भागात तेथील विशिष्ट जातींना आजही दिली जाते.
लडाख मधील बौद्ध समाज जशी अस्पृश्यता पाळतो अगदी तशीच अस्पृश्यता नेपाळ मधील बौद्ध समाज पाळतो. भारताचा पिटुकला शेजारी भूतान हाही एक बौद्ध देश आहे. यथील बौद्ध समाजात जाती आणि अस्पृश्यता या दोन्ही गोष्टी आहेत.,चला आता आपण जपानला जाऊया. या देशात बुराकुमीन नावाचे अस्पृश्य लोक आहेत. त्यांची संख्या साठ लाखाहून जास्त आहे. याना जपान मधील बौद्ध आणि शिंतो या दोन्ही धर्माचे लोक अस्पृश्य मानतात. पूर्वी यांचा कोणाला स्पर्श झाला तर त्याला बौद्ध साधूकडून शुद्ध होण्यासाठी विधी करून घ्यावी लागत असे. जपानमध्ये पूर्वी अस्पृश्यता नव्हती, पण भारतातून आलेल्या बौद्ध धर्माबरोबर ती तेथे आली असे मानले जाते.
श्रीलंका हा देश बौद्धबहुल आहे. येथील सिंहली लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. त्यांच्यात जातीव्यवस्था आहे, तसेच अस्पृश्यताही आहे. सिंहली समाजातील रोडी ही जात सर्वात मोठी अस्पृश्य जात आहेत. याशिवाय येथे किन्नराया नावाची एक अस्पृश्य जात आहे. भारताप्रमाणेच येथेही अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांची वस्ती गावाबाहेर असते.
बर्मा किंवा म्यानमार हाही एक बौद्ध बहुल देश आहे. हा जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक देश आहे. या देशातही जातीच जाती आहेत, तसेच अस्पृश्यताही आहे. Ⓜयाशिवाय कंबोडिया, विएतनाम, चीन, कोरिया, थायलंड, तैवान, मंगोलिया, होंग कोंग, लाओस हे सगळे देश, जेथे बौद्ध धर्मीयांची संख्या ७५% ते ९५% आहे, तेथे बौद्ध धर्मीयांनी त्यांच्यातीलच कांही जातींना बहिष्कृत करून त्याना अस्पृश्य ठरवले आहे. बर्मा किंवा म्यानमार हाही एक बौद्ध बहुल देश आहे. हा जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक देश आहे. या देशातही जातीच जाती आहेत, तसेच अस्पृश्यताही आहे. पूर्वी येथील अस्पृश्य जातींचा प्रचंड अभ्यास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही तेथील अस्पृश जातींचा अभ्यास करण्यासाठी या देशाला दोन वेळा भेट दिली होती. पाराग्यून ही येथील सर्वात मोठी अस्पृश जमात आहे.आपल्या येथील अनेक लोक मानतात की बौद्ध धर्मात जातीव्यवस्था व अस्पृश्यता नाही. प्रत्यक्षात बौद्ध धर्मात या दोन्ही गोष्टी आहेत हे वरील माहितीवरून दिसून येते.एखादा धर्मात काळानुसार अंधश्रद्धा आणि जातीव्यवस्था वाढते त्यासाठी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जबाबदार राहते पण काहीजण थेट धर्मावर आघात करून धर्माला दोष देतात.
धर्म कोणताच वाईट नाही काळानुसार धर्माच विक्षिप्तीकरण झाले आहे एवढाच .जगात बुद्ध आणि हिंदू धर्म एकाच संस्कृतीतून आल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर जातीभेद आहे तर हिंदू धर्मात जर जास्तच आहे.
=============================
Tags
धार्मिक-बौध्द
