सायकलीला लायसन होते
सायकलला लायसन म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.पण ब्रिटिश काळात सायकलला लायसन असे.कोणी बिगर लायसन सायकलवरून जात असेल समोर नाक्यावर जर हाफ चड्डीतला पोलीस ऊभा असेल आणि सायकलला लायसन (बिल्ला) लावला नसेल तर आणे दोन आणे दंड दयावा लागे.जुन्या पिढीतील लोकांना " सायकल परवाना" म्हणजेच लायसन्स हा प्रकार नक्कीच अद्याप आठवणीत असणार आहे.साधारण 1900 साली इंग्रजांनी भारतातील काही भागांमध्ये परवान्याची सुरूवात केली.वाचून आपणास हसू येईल.हे परवाने कोणाला? तर सायकलस्वारांना( त्या काळी सायकलींची संख्या जास्त होती), बैलगाड्यांना व टांग्यांना.हे परवाने पितळी प्लेट मध्ये असत व त्यावर परवाना क्रमांक,सन व गावाचे/ शहराचे नाव लिहिलेले असे.
सदरहू परवाने नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा तहसीलदार यांच्याकडून मिळत.हे पितळी बिल्ले म्हणजेच परवाने सायकलच्या हॅन्डलच्या मध्यभागी असणार्या पट्टीत स्क्रुने कायमस्वरूपी लावले जात .बैलगाड्रयांना किंवा टांग्यांना मात्र गाडीच्या पुढील भागात खिळ्याने ठोकले जाई.हे पितळी परवाने जर वरील उल्लेख केलेल्या वाहनांना लावले नाही तर पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीकडून दोन ते सहा अण्ण्याचा दंड आकारत.
पहिल्या चित्रातील परवाना हा 1964 सालचा असून पुणे शहराचा आहे म्हणून त्यावर पु.म.पा म्हणजेच पुणे महानगर पालिका असे लिहिलेले आहे.ही सायकलला लायसन पध्दत १९६६ पर्यंत होती,मोटरसायकल जशा वाढु लागल्या तशा सरकारला कर देणारी सायकल अडगळीत गेली.आता तर विदयुत बॅटरीवर चालणारया,बिगर लायसन मोटरसायकलचा जमाना आहे.
Tags
नवल



