या प्रसिद्ध वास्तुमधिल रहस्य लोकांना समजु दिल्या जात नाहीत

या प्रसिद्ध वास्तुमधिल रहस्य लोकांना समजु दिल्या जात नाहीत 


दि. १६ मे  २०२१ 

फेसबुक लिंक http://bit.ly/33Ob5vA
जगात गुढ गोष्टीना कमतरता नाही.आपण अश्या कितीतरी वास्तू, स्थळे पाहिले असतील किंवा त्यांच्या विषयी ऐकले असेल की, त्या वास्तूंमध्ये काही ना काही गुपीते दडलेली आहेत. जसे की गुप्त दरवाजे, खोल्या, गुहा वगैरे.
असेच काही रहस्यमय रस्ते, खोल्या जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या वास्तूंमध्ये आहेत.

या प्रसिद्ध वास्तुमधिल रहस्य लोकांना समजु दिल्या जात नाहीत

चला तर पाहुया
📍ताजमहल
आपण जो ताजमहल पाहतो तो पूर्ण ताजमहल नाही आहे.
ताजमहलच्या खाली एक गुप्त खोली आहे. पर्यटक फक्त वरच्या भागांमध्ये फिरू शकतो, ताजमहालच्या खाली असलेल्या खोलीत जाण्यास सर्वच पर्यटकांना मनाई आहे.
याचे कारण काय हे समजु दिले जात नाही.
📍सुवर्ण मंदिर, अमृतसर
सुवर्ण मंदिर संपूर्ण जगभरामधील शीख धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरामध्ये एक गुप्त मार्ग आहे, जो बिहारची राजधानी पटना येथे असणाऱ्या तख्त श्री पटना साहिब गुरुद्वारा पर्यंत गेला आहे. याच स्थानी गुरु गोविंद सिंह यांचा जन्म झाला होता.
या गुप्त मार्गाचा वापर स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी खूप वेळा केला गेला होता, पण नंतर हा मार्ग बंद करण्यात आला असे म्हणतात.

📍आग्रा येथे असलेला किल्ला
सलीम आणि अनारकलीची गोष्ट तर आपल्याला माहीतच आहे. शहनशाहने अनारकलीला भिंतींमध्ये दफन केले होते असे आपण ऐकत आलोय.पण तुम्ही जेव्हा आग्र्याचा किल्ला बघायला जाल तेव्हा तुम्हाला समजेल की,अनारकलीला भिंतीमध्ये दफन केले गेले नव्हते…असे म्हणतात की, अकबराने तिच्या कडून पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेऊन एका गुप्त रस्त्याने अफगाणिस्तानला पाठवले होते. ती तेथून बाहेर पडल्यावर तो रस्ता बंद करण्यात आला होता.
📍पिरॅमिड इजिप्तमधील पिरॅमिड हे जगातील सात आश्चर्य असलेल्या वास्तूंपैकी एक वास्तू आहे. या पिरॅमिडमध्ये सुद्धा गुप्त खोली आहे, ज्याला खूप वर्षांच्या मेहनतीनंतर पुरातत्व विभागाने शोधले होते.
या गुप्त खोलीची अलिशानता कोणालाही वेड लावू शकते.
पर्यटकांकडून या खोलीतील मौल्यवान वस्तूंशी छेडछाड होऊ शकते या भीतीने पर्यटकांना या खोलीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
📍आयफेल टॉवर
पॅरिसमध्ये असलेला आयफेल टॉवर हा जगातील सात आश्चर्य असलेल्या वास्तूंपैकी एक वास्तू आहे. या टॉवरमध्ये एक अशी खोली आहे, जिथे एका माणसाच्या राहण्याची जागा आहे.
कित्येक श्रीमंत लोकांनी ही जागा खरेदी करण्याची प्रयत्न केला होता. पण त्यामध्ये कोणालाही यश आले नाही.
📍इंडिया गेट
भारताची राजधानी दिल्ली येथे असलेल्या इंडिया गेटला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, पण खूप कमी लोकांना हे माहित आहे की, इंडिया गेटच्या वरील भागामध्ये एक गुप्त खोली आहे.
या खोलीमध्ये जाण्यास सामान्य माणसांना बंदी आहे. येथे फक्त संरक्षण अधिकारीच जाऊ शकतो.
या व अनेक कारणांमुळे या गोष्टी गुढ बनत चालल्या आहेत.
____________________________
*WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
*📍माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 📍*_
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম