बुटक्या लोकांचा गाव

बुटक्या लोकांचा गाव   


.        दि.१६ जून २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/35wEECp

बुटक्या लोकाकडे लोक कुतुहलाने तर काही तिरस्काराने पाहतात.पण हे चुकीचे आहे तसे पाहता दर २०,००० लोकांमधील एक मनुष्य बुटका असतो किंवा तो तसा जन्माला येतो, म्हणजेच ह्यांची जन्माची टक्केवारी खूप कमी असते, जवळपास एकूण लोकसंखेच्या ०.००५ इतकी असते. परंतु चीन मधील शिचुआन प्रांतातील यांग्सी गावाची गोष्ट काही वेगळीच आहे. या गावातील जवळपास ५० टक्के लोकसंख्या बुटकी आहे. या गावात राहणाऱ्या ८० पैकी ३६ लोकांची उंची फक्त २ फूट १ इंचापासून ३ फूट१० इंचाइतकीच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बुटके असल्यामुळे हे गाव बुटक्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु इतक्या प्रमाणात लोक बुटके असण्यामागचे रहस्य नेमके काय आहे, त्याचा थांगपत्ता गेल्या ६० वर्षांपासून या प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना देखील लागलेला नाही. 

गावातील वृद्ध माणसांचे म्हणणे आहे की, त्यांचे सुखमयी आणि आरामदायी जीवन काही दशकांपूर्वीच संपुष्टात आले होते, जेव्हा या प्रांतात एका भयानक रोगाने धुमाकूळ माजवला होता. त्यानंतर येथील लोकांमध्ये ही बुटकेपणाची समस्या दिसू लागली.त्यामध्ये जास्तकरून ५ ते ७ वर्षांची मुले आहेत. ह्या वयानंतरया मुलांची उंची वाढणे थांबते. या व्यतिरिक्त हे लोक अजून काही वेगळ्या समस्यांनी त्रस्त आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, १९८५ मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा गावात अशी ११९ प्रकरणे समोर आली. काळानुसार हा आजार थांबला नाही, तर पिढ्यानपिढ्या हा आजार वाढतच गेला. या आजाराला घाबरून लोक गाव सोडून जाऊ लागले, कारण त्यांना वाटत होते की हा रोग आपल्या मुलांना होऊ नये.


बुटक्या लोकांचा गाव,Butakya people's village

 


अचानक काहीतरी झाले आणि एका सामान्य उंचीच्या लोकांचे गाव बुटक्या लोकांच्या गावात परिवर्तित झाले. हे रहस्य शास्त्रज्ञ गेल्या ६० वर्षांपासून शोधत आहेत. शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लोकांनी या गावातील पाणी, माती, अन्न याची कित्येकवेळा तपासणी केली,परंतु ते या  समस्येमागचे कारण शोधू शकलेले नाहीत.१९९७ साली या आजाराचे कारण सांगताना या जमिनीत पारा असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले गेले होते, परंतु हे काही खरे कारण नसल्याचे सिद्ध झाले. काही लोकांच्या मते, जपानने काही दशकांपूर्वी सोडलेल्या विषारी गॅसमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. परंतु इतिहासानुसार जपानी कधीही चीनच्या या भागात आलेच नव्हते.अशी वेगवेगळी कारणे वेळोवेळी देण्यात आली आहेत, पण कधीही खरे काय ते मात्र समजले नाही. गावातील काही लोक मानतात की, हा कोणत्यातरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे, तर काही मानतात की, पूर्वजांचे व्यवस्थित अंत्यसंस्कार न केल्याने हे सर्व होत आहे.
याचे कारण शोधण्याचा प्रयत्न अनेक वर्षे चालू आहे पण अद्याप यश आले नाही.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!
🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵
=======================================

Butakya people's village


. June 16, 2021
Facebook link http://bit.ly/35wEECp
Butkas are looked down upon with some curiosity. But it is wrong to assume that one out of every 20,000 people is butkas or is born as such, which means that their birth percentage is very low, about 0.005 of the total population. But the story of Yangxi Village in China's Sichuan Province is different. About 50% of the population of this village is small. The height of 36 out of 80 people living in this village ranges from only 2 feet 1 inch to 3 feet 10 inches. The village is known as the village of Butkas because of its large number of people, but even the scientists who have been studying this question for the last 60 years have not been able to find out the secret behind the existence of such a large number of people.

The old men of the village say that their happy and comfortable life came to an end a few decades ago, when a terrible disease was rampant in the province. After that, this problem of smallness started appearing among the people here. Most of them are children of 5 to 7 years. After this age children stop growing taller. Apart from this, these people are suffering from some other problems. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon, when the census was conducted in 1985, 119 such cases came to light in the village. Over time, the disease did not stop, but continued to spread from generation to generation. People started leaving the village because they were afraid of the disease, because they thought that their children should not get it.
Butakya people's village
Suddenly something happened and the village of a normal height people was transformed into a village of small people. Scientists have been searching for these secrets for the last 60 years. Scientists and experts have repeatedly inspected the water, soil and food in the village, but they have not been able to find the cause of the problem. In 1997, the cause of the disease was said to be mercury in the soil, but this is not the case. Done. According to some, the problem is caused by toxic gases released by Japan decades ago. But historically, the Japanese never came to this part of China. Various reasons have been given from time to time, but it is never understood what is true. Some people in the village believe that it is the result of some evil force, while others believe that it is all happening because the ancestors were not properly buried.
Attempts to find the cause have been going on for years but have not been successful.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 * ☜ ♡
Mahiti seva Group Pethwadgaon! |!
🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম