व्हाटसअप वर व्हायरल होणारा तो भाजीचा व्हिडिओ किती खरा किती खोटा

 

 व्हाटसअप वर व्हायरल होणारा तो भाजीचा व्हिडिओ किती खरा किती खोटा

सोशल मीडियावर विशेषतः व्हॉटसअप व फेसबुक वर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एका टोपल्यातल्या फेसाळलेल्या पाण्यात सुकलेला भाजीपाला टाकला असता, तो ताजातवाना होताना बघायला मिळतंय. व्हिडिओसोबत दावा केला जातोय की व्यापाऱ्यांकडून बाजारात विकला जाणारा भाजीपाला अशा प्रकारच्या केमिकलचा वापर करून ताजा आणि टवटवीत ठेवला जातो. तेव्हा व्यापाऱ्यांकडून विचारपूर्वक भाजीपाला खरेदी करा.
माहिती सेवा ग्रूपचे सदस्य संतोष शिरसाट यांनी सर्व प्रथम या व्हायरल व्हिडीओ संदर्भात सत्य माहिती दिली.की,सदर व्हिडीओ राजू बागुल या कृषी उत्पादनांची मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीने शेतकऱ्यांना कंपनीचे प्रोडक्ट किती दमदार आहे हे दाखविण्याच्या हेतूने केला होता.
‘सदर व्हिडिओतील प्रोडक्टचे नाव ACTIVE+ असून ते केमिकल विरहित सिलिकॉन बेस नॉन आयोनिक स्टिकर आहे. save eco organic या कंपनीकडून या प्रोडक्टची निर्मिती केली जात असून कंपनी केवळ ऑरगॅनिक प्रोडक्टची निर्मिती करते. प्रोडक्ट केमिकल नसल्याने ते हानिकारक नाही.’ असे त्यांनी लिहिले होते.
शिरसाट यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही Activ प्रोडक्टविषयी अधिक माहिती कंपनीच्या  ‘सेव्ह इको ऑरगॅनिक’च्या वेबसाईटला भेट दिली. कंपनीच्या प्रोडक्टच्या यादीत आम्हाला ACTIVE+ हे प्रोडक्ट बघायला मिळाले.
त्यानुसार,शेतामध्ये फवारणी केली जाते आणि त्यानंतर लगेच पाऊस पडतो. पाऊस पडल्यावर फवारणी धुतली जाण्याची भीती असते. मात्र फवारणीच्या वेळी सर्फॅक्टंटचा वापर केलेला असेल तर फवारणीनंतर लगेच पाऊस पडला तरी पुन्हा फवारणीची आवश्यकता नाही. कारण सर्फॅक्टंटमुळे पानांवर फवारण्यात आलेली औषधी पानावर चिटकून राहण्यास मदत होते आणि फवारणी धुतली जात नाही.ACTIVE+ एक सर्फॅक्टंट आहे. सर्फॅक्टंट म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात मिसळल्यावर जे द्रावण तयार होते, ते वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांवर सहजरित्या पसरते. म्हणजेच वनस्पतीच्या पानावर तणनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करताना फवारणीच्या द्रावणामध्ये सर्फॅक्टंटचा वापर केल्यास फवारणी द्रावण पानावर अधिक चांगल्या प्रकारे पसरण्यास मदत होते.

व्हायरल होणारा तो भाजीचा व्हिडिओ किती खरा किती खोटा


ज्या कीटकनाशकाची अथवा तणनाशकाची फवारणी करायची आहे, ते पाण्यात व्यवस्थितरित्या मिसळण्यासाठी देखील सर्फॅक्टंट उपयोगी ठरते. शिवाय फवारणीपूर्वी सर्फॅक्टंट पाण्यात मिसळल्यास पानावर औषधी चांगल्या प्रकारे पसरते. वनस्पतीच्या पानांवर पडलेला प्रत्येक थेंब पानावर व्यवस्थितरीत्या पसरवण्याचे काम सर्फॅक्टंट करते. त्यामुळे पाने कुठेही कोरडी न राहता चांगल्या प्रकारे भिजतात. शिवाय वनस्पतीमध्ये पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषले जातात. ‘सायन्सडायरेक्ट‘नुसार नॉन-आयोनिक सर्फॅक्टंट विषारी नसतात.असे म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओत ज्या फेसाळ पाण्यात टाकल्याने भाजीपाला ताजा आणि टवटवीत होताना बघायला मिळतोय, ते फेसाळ पाणी म्हणजे सर्फॅक्टंट मिसळलेले पाणी आहे. बाजारात अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे सर्फॅक्टंट उपलब्ध आहेत. फवारणीच्या वेळी फवारणी द्रावणात मिसळल्यास ती उपयुक्त ठरतात

प. बंगालमधील जादवपूर विद्यापीठातले रसायन शास्त्राचे प्राध्यापक उत्पल रॉयचौधरी यांनी यावर बरेच संशोधन केले आहे.

मनात शंकाच नको असेल तर,फळे आणि भाज्या विकत आणल्यानंतर योग्य पद्धतीनं स्वच्छ करा. व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि हळदीचा वापर करून तुम्ही भाज्या-फळे स्वच्छ करू शकता. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये काही वेळासाठी हिरव्या पालेभाज्या भिजत ठेवा. यानंतर हलक्या हातानं रगडून पालेभाज्या स्वच्छ करून घ्या. एका चाळणीमध्ये भाज्या ठेऊन थंड पाण्यानं पुन्हा धुऊन घ्या.

Active+  कंपनिची लिंक- https://saveecoorganic.com/ProductDetails?id=eco-power-active-plus

सायन्स डायरेक्ट- https://www.sciencedirect.com/topics/pharmacology-toxicology-and-pharmaceutical-science/non-ionic-surfactants

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম