असे करा मतदार ओळखपत्र डाउनलोड

 असे करा मतदार ओळखपत्र डाउनलोड


ज्यावेळी मतदान नसते त्यावेळी आपणास "मतदार ओळखपत्राची" आठवण देखील येत नाही.पण निवडणुका लागल्या की,आपणास मतदान ओळखपत्राची आठवण येते. किंवा सरकारी योजना साठी सुध्दा ओळखपत्राची गरज भासते. शोधाशोध केल्यास आपल्या लक्षात येते की, आपले मतदान ओळखपत्र हरवले आहे किंवा खराब झाले आहे. मग आपली पळापळ होते.त्यावेळी वेळ कमी असतो व आपणास मतदान ओळखपत्र लवकर हवे असते.

असे करा मतदार ओळखपत्र डाउनलोड

हे होऊ नये म्हणून आपले मतदान ओळखपत्र वेळीच नविन काढून घेणे योग्य आहे. 

आतातर आपल्या मोबाईल वरून आपण आपले मतदान ओळखपत्र डाउनलोड करून घेऊ शकतो.

असे करा मतदान ओळखपत्र डाउनलोड

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला आहे, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे.किंवा डाउनलोड करता येणार आहे.

ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही, त्यांना तो निवडणूक आयोगाकडून मोबाईल नंबर पडताळणी करुन घ्यावा लागेल

सर्व प्रथम डिजिटल वोटर आयडीसाठी voterportal.eci.gov.in वर नोंदणी करावी लागेल.यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://www.nvsp.in/account/login  वर लॉगिन करावे लागेल.

येथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला EPIC क्रमांक किंवा फॉर्म क्रमांक द्यावा लागेल.

आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.

आपल्याला वेब पोर्टलवर ओटीपी टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला बर्‍याच वेबसाईटवर दिसतील, तुम्हाला डाऊनलोड ई-ईपीआयसीवर क्लिक करावे लागेल.

 आता तुमचा डिजिटल मतदार आयडी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड होईल.याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता.

याशिवाय व्होटरआयडी संबंधित कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर 1950 वर संपर्क साधू शकता.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম