शीर्षक नाही

 'घरोघरी मातीच्या चुली' ही म्हण केव्हाच मागे पडुन वर्षे लोटली सध्या घरोघरी गॅस सिलेंडर पाहायला मिळतोच मिळतो, हॉटेल असो वा घर,गॅस सिलेंडर ही जीवनावश्यक बाब मानली जाते. तुम्ही जर गॅस सिलेंडर एजन्सी घेणार असाल तर ही संधी सोडु नका.कारण हा व्यवसाय बारा महिने चालणारा आहे.फक्त संधीची वाट पाहायची. 

भारतामध्ये तीन सरकारी कंपन्या गॅस वितरीत करतात. भारत पेट्रोलियमचा 'भारत गॅस', इंडियन आॉईल कारपोरेशनचा 'इंडेनगॅस'व हिंदुस्थान पेट्रोलियमचा 'एच पी' या गॅस सिलेंडर साठी तुम्हाला गॅस एजन्सी मिळु शकते.या कंपन्याचे काही नियम आहेत. 

ज्या भागात गॅस एजन्सी द्यायची आहे त्या भागातील स्थानिक वर्तमानपत्रात एजन्सी त्या बद्दल जाहिरात देत असते.अशी जाहीरात देणे बंधनकारक आहे.त्यामुळे या एजन्सी संदर्भात  जाहिरातींवर लक्ष ठेवणे गरजचे आहे. विविध वर्तमानपत्र आणि या तीन कंपन्यांच्या वेबसाईटवर याची जाहिरात झळकत असतात. 

गॅस एजन्सी साठी सरकारी नियमानुसार सर्व साधारण श्रेणीतील उमेदवारीसाठी ५०℅ आरक्षण असते.शिवाय अनुसूचित जाती जमाती साठीही आरक्षण असते. याचबरोबर माजी सैनिक, राष्ट्रीय खेळाडू, पोलीस दल, भारतीय सेनाव शारीरिक दूर्षट्या विकलांग लोकानाही या कंपन्या प्राधान्य देते. 

नियम व अटी

हा व्यवसाय करण्यासाठी काही कर्मचारी असणे आवश्यक आहे.गॅस सिलेंडर वितरणासाठी वाहन असावे. 

  • गॅस एजन्सी अर्ज करण्यासाठी कमाल शुल्क १० हजार रुपये आहे. 
  • गॅस एजन्सीचा संपुर्ण खर्च हा किमान १५ लाख रूपये आहे. 
  • गॅस एजन्सी साठी जाहीरात व अधिसूचना https://www.lpgvitarakchayan.in या कंपनीच्या बेबसाईटवर पहावी.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম