चपेटा हनुमान -निपाणी

निपाणी जवळील "चपेटा हनुमान"


चपेटा हनुमान -निपाणी

फेसबुक लिंक https://bit.ly/3b4brB1
 मारूतीला,  हनुमान,हनुमंत,बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते. हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे. हनुमंताला मारूती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते. हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे.
मारूतीच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून, हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्‍ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्यही आले.अशा या मारूतीचे अनेक रूपात मंदिरे आहेत. त्यापैकी एक चपेटा मारूती.कोल्हापूर पासून ४० किमी अंतरावर निपाणी असुन हे गाव मराठी बहुभाषिक आहे पुर्वी
ते महाराष्ट्र राज्यात होते सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. 

चपेटा हनुमानाची सुंदर मूर्ती

चापट मारण्याच्या आवेशात असणारा मारूती याच्या पायाखाली पनवती नामक राक्षसीण आहे असे मानले जाते.अशा प्रकारच्या 'मारुती' शिल्पांमध्ये मारुतीचा डावा पाय
'पनवती राक्षक्षिणे'वर असतो, डावा हात कमरेवर असतो, तर
उजवा हात कानाजवळ / कानफडात मारल्यागत असतो,
म्हणून याला कानफाडया मारुती असं म्हणतात. (उजव्या
हाताने संकटांना चापटीने पळवून लावणारा असा याचा अर्थ) 
निपाणी मध्ये श्री आण्णाप्पा व
बाळासाहेब हुक्कीरे यांच्या बाळेघोल ते निपाणी रस्ता कॉर्नर वर असलेल्या शेतामध्ये असलेला ही "चपेटा हनुमान " उर्फ " अक्षय ( रावणाचा पुत्र ) अनुग्रह मुर्ती " या नावाने ओळखली जाणारी ही सुंदर मुर्ती असुन या मुर्तीच्या एका पायात अहिरावण राक्षस आणी दुसरा पाय
विरासारखा लढायला सज्ज ... एक हात कमरेवर रुबाबात ठेवलेला आणी दुसरा हात महिरावणाला चापट मारण्यासाठी उगारलेला ... असा हा दानवांचा विनाश करण्यासाठी सदैव सज्ज असलेला विर हनुमान ...
एकदा अवश्य पहायला हवा असाच आहे ...
हे मंदिर निपाणी कापशी बाहेरचा रस्ता बनवत असताना जेसीबीच्या सहाय्याने भराव काढत असताना कोसळले होते आणी ते पुन्हा उभे केले गेले ...या मंदिराच्या शेजारी शिलालेख असुन त्यावर, 

" श्री शालीवाहन शके १८३१
विकारी नाम संवत्सरीयास
हे वृंदावन जीवनदास गुरु
कृष्णदास बैरागी याणी बांधीले "
" ॥ श्री ॥
याचा बांधणावळीचा खर्च रुपये १००"
असे दोन स्वतंत्र शिलालेख आहेत

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম