कसे जुळले शरद पवारांचे लग्न ?‼️



कसे जुळले शरद पवारांचे लग्न


फेसबुक लिंक https://bit.ly/2EHTg80
'एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बीकॉम झाला आहे. पण स्वत: काही करत नाही. गावाकडे शेती आहे. नुकताच आमदार झाला आहे.' असे स्वत: पवार साहेबांच्या ज्येष्ठ बंधू बापूसाहेब यांनी प्रतिभाताईंचे वडील सदू शिंदे यांना सांगितले.
सदू शिंदे यांची ज्येष्‍ठ कन्या जिजा, म्हणजेच प्रतिभा हिला पाहाण्याचा कार्यक्रम ठरला. परंतु, मुलगा शिकलेला असून, काहीच करत नाही, हे ऐकताच बिन कामाचे स्थळ, म्हणत सदू शिंदे यांच्या वडिलांना पसंत पडणे शक्यच नव्हते. पण हे 'स्थळ' म्हणजे साक्षात बापूसाहेबांचा धाकटा भाऊ शरद आहे, हे कळल्यावर प्रश्नच मिटला.शरदराव प्रतिभाताईंना पाहायला पुण्यात आले. पवारसाहेबांनी खादीचा जाडाभरडा गर्द गुलाबी बुशशर्ट आणि तसलीच पण हिरवीगार पँट परिधान केली होती. शेजारचे वर्तमानपत्र उघडून चाळत होते. आजोबांनी मुलगा पाहिला. पवारसाहेबांचा मधील वक्तशीरपणा त्यांना एका क्षणात ओळखला आणि चटकण होकारही दिला.शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह बारामतीत झाला. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता, विशेष म्हणजे विवाह समारंभाला सगळ्या पंचक्रोशीतील माणसे उपस्थित होती. आपल्या आमदाराच्या विवाहाला ते सगळे उत्साहाने आले होते.शरद आणि प्रतिभा हे एक पूर्णपणे एकरूप झालेले जोडपे आहे. एकाच्या मनात जे सुरु आहे, तेच दुसर्‍यार्‍या समजाय वेळ लागत नाही. एकाने हात पुढे केला, तर त्याला काय हवे आहे ते दुसर्‍याला न सांगताच समजते. तसे काहीसे शरदराव आणि प्रतिभाताईचे झाले.
 फोटो पहा
कसे जुळले शरद पवारांचे लग्न
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম