एटीएममधून पैसे बाहेर आले नाहीत तर काय करावे

एटीएममधून पैसे बाहेर आले नाहीत तर काय करावे   


.       

फेसबुक लिंक https://bit.ly/31wfcMf
     काहीवेळा आपण एटीएममधून पैसे काढायला जातो. रक्कम एंटर केल्यानंतर पैसे येण्याची वाट पाहत राहतो. पण मशिनमधून पैसे येतच नाही. कंटाळून आपण बाहेर पडतो. नंतर कधीतरी बँकेतील अकाऊंट चेक करायला गेले की लक्षात येते, की ती रक्कम खात्यातून कमी झाली आहे. अशा वेळी काय करावे सुचत नाही. अनेकांच्या बाबतीत असे घडले असेल. पण थोडी खबरदारी घेतलीत तर तुमचे नुकसान होणार नाही

एटीएममधून पैसे काढायला गेलात आणि पैसे आले नाहीत तर सर्वात आधी बँकेच्या ज्या शाखेत तुमचे खाते आहे तिथे तक्रार नोंदवा. ज्या एटीएममधून तुम्ही पैसे काढत आहात, त्याच्या जवळ असलेल्या शाखेतही तुम्ही तक्रार करू शकता.,तक्रार नोंदवल्यावर त्याची एक कॉपी तुमच्याजवळ ठेवा.अनेक बँकांच्या एटीएम केंद्रांमध्ये फोनही असतात, त्याद्वारे बँकेच्या कॉल सेंटरशी थेट संपर्क साधून पैसे येत नसल्याची सूचना तुम्ही देऊ शकता.  बँकेला सूचना दिल्यानंतर 30 दिवसांत जर तुमच्या तक्रारीवर काही कारवाई झाली नाही तर तुम्ही रिझर्व्ह बँक किंवा बँकिंग ओम्बड्समॅनकडे तक्रार नोंदवू शकता. यासाठी इंटरनेटची मदतही तुम्ही घेऊ शकता. यासंबंधीचा नियम असा आहे की, बँकांच्या एटीएमद्वारा नेहमी तक्रार येते की एटीएममधून पैसे काढूनही ग्राहकांना पैसे मिळत नाहीत. आरबीआयचे म्हणणे आहे की, असे अडकलेले पैसे ग्राहकांनी तक्रार केल्यावर 12 दिवसांच्या आत त्यांना ते दिले गेले पाहिजेत. जर एखादी बँक 12 दिवसांत ग्राहकाला पैसे देत नसेल तर त्यानंतर त्या बँकेला दंड द्यावा लागेल.

┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

एटीएममधून पैसे बाहेर आले नाहीत तर काय करावे

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম