पाकिस्तान संघाकडुन सचिन खेळला होता

पाकिस्तान संघाकडुन  सचिन खेळला होता  



.        दि. २० सप्टेंबर २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/2RIdgdY
        सचिन तेंडुलकर हा भारताकडून खेळण्यास सुरुवात करण्याच्या आधी एकदा पाकिस्तानसाठी खेळला होता.
१९८७ साली ब्रेबॉन स्टेडियमवर भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व सामन्यात हा प्रकार घडला होता.

पाकिस्तान संघाकडुन  सचिन खेळला होता

त्यावेळी सचिन तेंडुलकर मैदानात पाकिस्तानकडून बदली क्षेत्ररक्षक म्हणून उतरला होता.भारतीय संघ हा जगातील  एकमेव असा संघ आहे, जो कसोटी सामन्याच्या एका दिवसात दोनदा संपूर्ण संघ बाद झाला. असे इतर कोणत्याही संघाबरोबर झालेले नाही. १९५२ मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना घडले होते.
व्ही. व्ही. एस लक्ष्मण हा एकमेव असा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे, जो १०० कसोटी सामने खेळला आहे. तरीदेखील तो एकही विश्व चषकाचा सामना खेळलेला नाही.
आपली धडाकेबाज फलंदाजी आणि खास “हेलीकॉप्टर शॉट” साठी प्रसिध्द असणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार! महेद्रसिंग धोनी.धोनीने आशिया खंडाच्या बाहेर, म्हणजे श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश वगळता इतर ठिकाणी एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही शतक झळकावले नाही आहे.
क्रिकेटचा देव म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या रणजी करंडक क्रिकेट कारकिर्दी मध्ये फक्त एकदाच शून्यावर बाद झाला आहेसुनील गावसकर हे आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये तीन वेळा कसोटी सामन्याचा पहिल्याच चेंडूमध्ये बाद झाले होते.भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याने क्रिकेटमधील ६० षटकांचा, ५० षटकांचा आणि २० षटकांचे विश्व चषक जिंकले आहेत. ६० षटकांचा विश्वचषक १९८३ मध्ये, ५० षटकांचा विश्वचषक २०११ मध्ये आणि २० षटकांचा विश्वचषक २००७ मध्ये जिंकला आहे
____________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম