ठरावीक वयाची अट असताना एम.पी.एस.सी.मध्ये आता संधीचा गोंधळ.

ठरावीक वयाची अट असताना एम.पी.एस.सी.मध्ये आता संधीचा गोंधळ.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(maharashtra public service commission/m.p.s.c. ) मार्फत नुकतेच एक परीपत्रक प्रसिध्द करण्यात आले असून त्यात परीक्षेला कोणत्या प्रवर्गातील परीक्षार्थी उमेदवार किती वेळा बसू शकतो याचा उल्लेख केला आहे.यात खुल्या प्रवर्गासाठी फक्त सहा संधी असल्याने या प्रवर्गातील परीक्षार्थी  उमेदवाराकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी एक-दोन वर्षाच्या अंतराने वयाची अट निश्चित केली आहे,या सर्वच परीक्षा पदवी शिक्षणानंतरच देता येतात.आपल्या भारतातील शिक्षण पध्दतीत 10+2+3 स्तराचा चा समावेश आहे तर पाल्य वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत जाण्यास पात्र ठरत असल्याने,तो वयाच्या सोळाव्या वर्षी दहावी,अठराव्या वर्षी बारावी आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी पदवीधारक होतो,तेथून पुढे वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षा देण्यास पात्र होतो.

नविन परीपत्रकानुसार स्पर्धापरीक्षेला बसण्यासाठी खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थीसाठी फक्त सहा संधी आहेत,मागास प्रवर्गासाठी नऊ संधी तर अनु.जाती/जमाती साठी अमर्यादीत (ठरावीक वयापर्यंत) संधी दिलेली आहे.याशिवाय पुर्व परीक्षेला बसला व मुख्य परीक्षेला बसला नाही तरी ती एक संधी ग्राह्य धरली जाणार आहे.आणि परीक्षार्थी कांही कारणास्तव परीक्षा केंद्रात वेळेत पोहोचला नाही किंवा दुसऱ्या कारणास्तव परीक्षेला मुकला तरी तीही संधी ग्राह्य धरली जाणार आहे.या सर्वच बाबी अन्यायकारक आहेत.

वरील शैक्षणिक बाबींचा विचार केला तर पदवीधारक वयाच्या एकवीस वर्षापासून वयाच्या सत्तावीस वर्षापर्यंतच परिक्षा देऊ शकणार आहे.बाकीच्या कांही वर्षांच्या संधीसाठी तो मुकणार आहे.आणि या बद्दलच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.


सरकारी नियमानुसार ठरावीक(30-33) वयानंतर खुल्या प्रवर्गासाठी  नोकरीसाठी प्रयत्न करता येत नाहीत,कांहीजन निकषानुसार वयाच्या शेवटच्या वर्षी स्पर्धापरिक्षेत पात्र होऊन नोकरीत रुजू झालेले आहेत.असे असताना खुल्या प्रवर्गासाठी फक्त सहा संधी देणे अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे नोकरीत जाण्यासाठी ठारावीक वयाची अट असताना संधीची बंदी कशासाठी?असा प्रश्न सध्या तरुणांसमोर आहे,ही संधीची अट रद्द करावी अशी मागणी स्पर्धापरीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম